India vs New Zealand, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३ मधील भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी समालोचन पॅनेलची यादी जाहीर करण्यात आली आहे. चाहत्यांच्या अपेक्षेनुसार आयसीसीने समालोचक पॅनल तयार केले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यातील समालोचन पॅनेलचे नेतृत्व अनुभवी सुनील गावसकर करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इयान स्मिथ, रवी शास्त्री, सिम डौल, दिनेश कार्तिक, अंजुम चोप्रा, संजय मांजरेकर आणि इऑन मॉर्गन यांच्यासह सुनील गावसकर समालोचन पॅनेलमध्ये सामील होणार आहेत. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तर हे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळेल.
विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील समालोचन पॅनेल देखील विश्वचषक २०१९ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात जसे होते तसेच ठेवण्यात आले आहे. या यादीत फक्त दोन माजी खेळाडूंची भर पडली आहे. दिनेश कार्तिक आणि अंजुम चोप्रा यांचा यात समावेश करण्यात आला आहे. कार्तिक २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यावेळी तो टीम इंडियात स्थान मिळवू शकला नाही.
विश्वचषक २०१९ची पुनरावृत्ती होणार की टीम इंडिया बदला घेणार?
विश्वचषक २०१९ मध्येही भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडशी झाला होता. या सामन्यात किवी संघाने भारताचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेर केले होते. अशा स्थितीत भारतीय संघाला त्या चार वर्षांच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. रोहित ब्रिगेड सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. साखळी फेरीतील सर्वच्या सर्व नऊ सामने हे भारताने जिंकले आहेत.
वर्ल्ड कप २०१९चा सेमीफायनल सामना प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात असेल. हा सामना माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता, ज्यामध्ये मार्टन गुप्टिलने धोनीला धावबाद करून भारताच्या आशा धुळीस मिळवल्या. भारताने यावेळी आपले सर्व साखळी सामने जिंकले असून संघाने स्पर्धेवर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा अँड कंपनीसाठी जुने हिशोब चुकता करण्याची ही सर्वोत्तम संधी असेल.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील लीग सामने संपले आहेत. क्रिकेटच्या महाकुंभात आता फक्त तीन सामने शिल्लक आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे विश्वविजेते होण्यापासून दोन विजय दूर आहेत. मात्र, या चौघांपैकी एकाच संघाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता प्रत्येक सामन्यात कोणत्या ना कोणत्या संघाचे हृदय तुटणार हे नक्की.