भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा कार्यवाहक कर्णधार शिखर धवनने ७७ चेंडूत ७२ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. धवनला जी दाद मिळायला हवी होती ती मिळाली नाही, असं शास्त्री सांगतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑकलंड येथे सुरु असलेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडियाने ते आमंत्रण स्वीकारत कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी १२४ धावांची सलामी भागीदारी दिली. २४ षटकात भारताने १२४ धावा केल्या होत्या. पण लागोपाठ शिखर धवन ७२ आणि शुबमन गिल ५० धावा करून बाद झाला. भारताची पडझड झाल्यानंतर मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने डाव सावरत शानदार अर्धशतक झळकवले. त्याने ७६ चेंडूत ८० धावांची दमदार खेळी केली. त्याला संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मोलाची साथ देत टीम इंडियाला ३०० चा टप्पा गाठण्यास मदत केली. संजूने ३८ चेंडूत ३६ तर वॉशिंग्टन सुंदरने सुरेख फटकेबाजी करत १६ चेंडूत ३७ धावा करत भारताची धावसंख्या ३०६ पर्यत पोहचवली.
सामन्यादरम्यान प्राइम व्हिडिओवर शास्त्री म्हणाले, “तो खूप अनुभवी आहे, पण त्याचे म्हणावे तसे कौतुक मिळालेले झाले नाही. खरे सांगायचे तर, विराट कोहली आणि रोहित शर्मावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले गेले, परंतु जर तुम्ही त्याचे एकदिवसीय रेकॉर्ड बघितले तर चित्र अगदी स्पष्ट होईल. जर तुम्ही सामन्यांमधील आघाडीच्या संघांविरुद्धच्या त्याच्या काही डावांवर नजर टाकली, तर त्याच्यानावावर उत्कृष्ट रेकॉर्ड जमा आहेत. फलंदाजीत सलामीला असणारा डावखुरा फलंदाज जेव्हा सातत्याने चांगली कामगिरी करतो त्यावेळेस तो खूप मोठा फरक करतो. त्यामुळे तुम्हाला शिखर धवनकडे वय झालं म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही.”
शास्त्री यांना वाटते की शिखर, त्याच्या नैसर्गिक फटक्यांच्या खेळाव्यतिरिक्त, या फॉरमॅटमधील त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग होईल आणि संघातील तरुणांना तो अधिक मार्गदर्शन करेल. “त्याला चेंडू त्याच्या बॅटवर यायला आवडतो आणि मला वाटते की त्याचा हा अनुभव पुढे संघातील या नवोदितांना कामी येईल. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघात अनेक तरुण खेळाडू आहेत आणि खेळाच्या या स्वरूपातील त्याचा अनुभव सर्वांना उपयोगी पडेल,” असे माजी प्रशिक्षक म्हणाले.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या २४ षटकानंतर भारताला एकापाठोपाठ एक असे चार धक्के देत भारताला साडेतीनशे धावा करण्यापासून रोखले. टिम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अॅडम मिल्ने याने एक गडी बाद करत त्या दोघांना साथ दिली. भारत हा सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना देखील खूप अडचण होणार हे निश्चितच.