भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार विजय मिळवला. रविवारी (दि. २० नोव्हेंबर) माऊंट माऊंगनुई येथे पार पडलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडने ६५ धावांना विजय मिळवला. भारताच्या विजयाचा शिल्पकार सूर्यकुमार यादव ठरला. त्याला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. यासह भारताने या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. त्याच सामन्यात षटकार वाचवत श्रेयस अय्यरने इतर खेळाडूंसमोर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदाहरण घालून दिले.
अर्शदीप सिंगच्या षटकात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना श्रेयस अय्यरने दमदार क्षेत्ररक्षण करत षटकार वाचवला. यामुळे विलियम्सनला केवळ दोन धावा काढता आल्या. क्षणभर त्याला असे वाटले की हा झेल आपण पकडू शकतो मात्र तो पकडला तर सीमारेषा ओलांडली गेली असती म्हणून त्याने स्वतः सीमारेषा ओलांडण्याआधीच तो चेंडू अलीकडे टाकत संघासाठी चार धावा वाचवल्या. त्याच्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या नमुन्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विल्यमसनने एक वेगवान फटका मारला होता तरी देखील, श्रेयसने कमी वेळात ही कमाल दाखवली.
भारत-न्यूझीलंड या दुसऱ्या टी२० सामन्यात फलंदाज श्रेयस अय्यर हा विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. यासह टी२० मध्ये तो हिट विकेट होणारा तो चौथा भारतीय ठरला. तसेच यातील दोन खेळाडूंना तर एकट्या लॉकी फर्गयुसन यानेच गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीवर अय्यर बरोबरच हर्षल पटेल हा पण हिट विकेट या पद्धतीने बाद झाला होता. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा श्रेयस हा २५ वा फलंदाज आहे. तसेच, अशा प्रकारे बाद होणारा तो भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी हर्षल पटेल, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे असे बाद झाले आहेत.
आगामी काळात श्रेयस अय्यरला मोठी खेळी करून दाखवावी लागेल. भारतीय संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो तशी फलंदाजी कोणीच करू शकत नाही. एकेरी-दुहेरी धावा विराट कोहलीनंतर जर कोणी काढत असेल तर तो श्रेयस अय्यर आहे. सध्या तो त्याच्या खराब फॉर्म मधून जात आहेत. लवकरच त्याला त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतावं लागेल.