भारताचा सलामीवीर क्रिकेटपटू शुबमन गिलने कानपूरमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जबरदस्त झेल घेतला. सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचनंतर उमेश यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने नाईट वॉचमन विल सोमरविलेला तंबूत धाडले.

उमेशने ३६व्या षटकाच्या पहिला चेंडू सोमरविलेला आखुड टप्प्याचा खेळवला. सोमरविलेने तो पुल करण्याचा प्रयत्न केला. फाइन लेगला तैनात असलेल्या शुबमनने समोर धावत येत अप्रतिम झेल पकडला. शुबमनच्या या झेलमुळे भारताची विकेट घेण्याची आशा वाढली. सोमरविलेने सोमरविलेने ३६ धावा केल्या आणि लॅथमसोबत ७६ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा – “दुर्दैवीरित्या माझ्या देशात हे घडतंय…”, कानपूर कसोटीत कॉमेंट्री करणाऱ्या भारताच्या माजी क्रिकेटरचा ‘मोठा’ खुलासा!

कानपूर कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेला विल यंग दुसऱ्या डावात जास्त योगदान देऊ शकला नाही. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने यंगला (२) बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि विल सोमरविले यांनी १ बाद ४ धावांवरून पुढे फलंदाजीला सुरुवात केली. लंचपर्यंत दोघांनी किल्ला लढवला. तत्पूर्वी श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला.

Story img Loader