भारत आणि न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला. लखनऊच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. दरम्यान फिरकीपटू युजवेंद्र चहलने या सामन्यात नवा विक्रम आपल्या नावावर केल आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युजवेंद्र चहलने फिन ऍलनची विकेट घेत मोठी कामगिरी केली आहे. तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागे टाकले. भुवनेश्वरने भारताकडून ९० विकेट्स घेतल्या आहेत, तर चहलच्या नावावर आता ९१ विकेट्स आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
युजवेंद्र चहलने संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला आहे. ज्याच्या नावावर ९० विकेट्स आहेत. चहलने ७५ सामन्यात ९१ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अश्विन ७२ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. बुमराहच्या नावावर ७० विकेट्स असून तो चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आहे, ज्याने ६४ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Women U19 WC: चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडियाने ‘काला चष्मा’ गाण्यावर केला डान्स; पाहा VIDEO
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊथीच्या नावावर आहे. ज्याने १०७ सामन्यात १३४ विकेट घेतल्या आहेत. शाकिब अल हसन १२८ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिदने १२२, ईश सोधीने ११२, तर मलिंगाने १०७ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – ICC U-19 Womens T20 WC: फायनल जिंकल्यानंतर कर्णधार शफाली वर्मा झाली भावूक, पाहा VIDEO
सामन्याबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने प्रथम न्यूझीलंड संघाला ९९ धावांवर रोखले. त्यानंतर १०० धावांचा पाठलाग करताना १९.५ षटकांत १०१ धावा करून विजय मिळवला. ज्यामध्ये भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद २६ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर गोलंदाजीत अर्शदीपने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.