India vs New Zealand 3rd Test Day 2 updates: भारत आणि न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना वानखेडेवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक होईपर्यंत भारताने ५ विकेट्स गमावत या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. टीम इंडियाने चांगली गोलंदाजी करत किवी संघाला २३५ धावांवर रोखले. मात्र, या खेळीदरम्यान भारताच्या फिरकीपटूंनी बरेच नो बॉल टाकले, ज्यामुळे भारताचे महान खेळाडू सुनीव गावस्कर संतापले. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या प्रकरणावर ऑन एअर मजा फिरकी घेतली.
न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनेक नो बॉल टाकले हे पाहून माजी भारतीय फिरकीपटू सुनील गावस्कर वैतागले होते. सुंदर वारंवार नो बॉल टाकत होता, यादरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रीने एक मजेशीर प्रसंग शेअर केला. त्यांनी सांगितले की, सुंदरने नो बॉल टाकल्यावर गावस्कर संतापले आणि लंच करताना रागाच्या भरात त्याने एक प्लेट फोडली.
हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
शास्त्री गंमतीने म्हणाले, ‘सुनील गावस्कर जेवत होते. त्यांनी सुंदरचा नो बॉल पाहून प्लेट भिंतीवर फेकली. देवाचे आभार मानतो की ते (सुनील गावसकर) स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत नव्हते. नाहीतर वॉशिंग्टन कधीच वॉशिंग्टन डीसीच्या जवळ जाऊन पोहोचला असता. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्धच्या डावात एकूण नऊ नो बॉल टाकले, त्यापैकी फक्त एक नो बॉल वेगवान गोलंदाज आकाश दीपने टाकला. याशिवाय सुंदरने सर्वाधिक पाच नो बॉल टाकले तर जडेजाने तीन टाकले.
न्यूझीलंडचे माजी खेळाडू इयान स्मिथनेही भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या नो बॉलवर फिरकी घेतली. ते म्हणाले, ‘अरे आणखी एक नो बॉल. सुनील गावसकर कुठे आहेत? हातात माईक घेऊन आता ते त्यांच्या मागे धावतील. यानंतर खुद्द सुनील गावस्कर यांनीही यावर उत्तर दिले आणि ऑन एअर येऊन त्यावर प्रतिक्रिया दिली. गावस्कर म्हणाले, ‘हो, चिंता करू नका. मी माझे रनिंग शूज पण घातले आहेत. मात्र, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
जडेजा आणि वॉशिंग्टनने आठ नो बॉल टाकल्यानंतरही न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात केवळ २३५ धावाच करू शकला. भारताकडून जडेजाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याने कारकिर्दीत १४व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. याबाबतीत झहीर खान आणि इशांत शर्माला त्याने मागे टाकले. त्याच्याशिवाय सुंदरनेही गोलंदाजीत आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या.