भारतीय क्रिकेट संघ १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी १२.३० सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर केन विल्यमसन सेना असणार आहे. या मालिकेच्या कोणाचे कोणावर वर्चस्व राहिले आहे. ते आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
या मालिकेपूर्वी भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण ६ टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. २००८ मध्ये भारत पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेसाठी गेला होता, जेव्हा यजमान न्यूझीलंडने मालिका २-० ने जिंकली होती. गेल्या वेळी जेव्हा या दोघांमध्ये मालिका होती, तेव्हा न्यूझीलंड संघ भारतात आला होता, त्या मालिकेत भारताने ३-० असा क्लीन स्वीप केला. २०१९-२० मध्ये भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानावर ५-० ने धूळ चारली होती. तसेच न्यूझीलंड आणि भारत यांनी एकमेकांविरुद्ध ९-९ टी-२० सामने जिंकले आणि हरले आहेत.
या दोघांमध्ये खेळलेल्या टी-२० मालिकेतील आकडेवारी –
सर्वाधिक धावा: न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक टी-२० धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, जो या मालिकेत खेळणार नाही. रोहितने ५११ धावा केल्या आहेत. कॉलिन मुनरोने भारताविरुद्ध न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४२६ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक अर्धशतके: रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ६ अर्धशतके आणि मुनरोने भारताविरुद्ध सर्वाधिक ४ अर्धशतके झळकावली आहेत.
टी-२० मालिकेसाठी भारत आणि न्यूझीलंड संघ –
भारत: हार्दिक पंडय़ा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक/ उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी , ब्लेअर टिकनर