टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना २४३ धावांवर रोखले. शमीचे ३ बळी तर हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेन्द्र चहलचे २-२ बळी याच्या जोरावर भारताने ही कामगिरी केली. या सामन्यात एक विचित्र गोष्ट घडली आणि त्यावरून बंदी उठवल्यानंतर आपला पहिलाच सामना खेळणारा हार्दिक पांड्या शिखर धावांवर चिडला.

हार्दिकने १३व्या षटकाचा दुसरा चेंडू फेकला. हा चेंडू रॉस टेलरने डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवला.शिखर धवनने सीमारेषेवरून धावत येऊन हा चेंडू अडवला खरा पण त्याने फेकलेला थ्रो हा अत्यंत विचित्र पद्धतीचा होता. धवनने फेकलेला चेंडू ना धड गोलंदाजच्या दिशेने गेला, ना धड यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. तो चेंडू खेळपट्टीच्या मधोमध गेला आणि तसाच पुढे गेला. रोहित शर्मा गोलंदाच्या मागे उभा होता. त्याने हा चेंडू अडवण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण तो थ्रो अत्यंत विचित्र पद्धतीने फेकला असल्याने त्यालाही तो चेंडू अडवता आला नाही. त्यावेळी हार्दिक पांड्या धवन चिडला आणि ‘कम ऑन यार’ असं म्हणत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये हार्दिकने महिलांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पान आता त्याच्यावरील बंदी तात्पुरती उठवण्यात आल्यानंतर त्याने हा पहिलाच सामना खेळला.

Story img Loader