IND vs NZ Test Match Tickets Mumbai Wankhede Stadium: भारत वि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे सुरू होणार होता, पण बंगळुरूमधील पावसामुळे पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत नाणेफेक झालेली नाही. त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहता पहिल्या कसोटीत किती दिवस सामना खेळवला जाईल, याबाबत शंका आहे. तर दुसरा कसोटी सामना पुणे येथे तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्याची तिकिटं कधी विकली जाणार, याबाबत माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – Mithali Raj: “हरमनप्रीतच्या जागी नवा कर्णधार नेमण्याची योग्य वेळ…”, मिताली राजचे भारताच्या वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर मोठं वक्तव्य; दोन नव्या कर्णधारांची नावंही सुचवली

Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Happy Diwali Wishes 2024 Wishes in Marathi
Diwali Wishes 2024 : प्रियजनांना द्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक हटके मराठी मेसेज
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
female police officer nearly kisses womans lips video viral
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
vishakha subhedar son made besanache ladoo for first time
विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
Goa Boycott Viral Post man called tourist trap for inflation and dirty beaches debate broke out
“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…

मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑनलाईन तिकिट विक्री येत्या १८ ऑक्टोबरपासून म्हणजेच शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे. एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील मुलांना आणि हॅरिस आणि जाईल्स शिल्ड स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील मुलांमधील खेळाप्रति प्रेम वाढावे यासाठी या कसोटी सामन्यासाठी मोफत पास वाटप करण्यावर सर्वानुमते एकमत देण्यात आले. हा प्रस्ताव एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मांडला होता.

हेही वाचा – Bangladesh Coach: बांगलादेशी खेळाडूच्या श्रीमुखात लगावल्याने संघाच्या कोचची पदावरून हकालपट्टी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

डिसेंबर २०२१ नंतर म्हणजेच तीन वर्षांनंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड कसोटी सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे हा कसोटी सामना जास्त खास असणार आहे. तिकिटांच्या दराबद्दल बोलायचं तर नॉर्थ स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड आणि विजय मर्चंट स्टँड, जे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत, त्याची किंमत १५०० रुपये आहे.

सुनील गावस्कर स्टँडसाठी, ३२५ रुपये आणि पूर्वकडील वरच्या भागासाठी ६२५ रुपये तिकिटांची किंमत आहे. ही किंमत धोरणे अशा हाय-प्रोफाइल सामन्यांच्या होस्टिंगशी संबंधित खर्चासह प्रवेशयोग्यता संतुलित करण्याचा प्रयत्न दर्शवतात.

Story img Loader