IND vs NZ 3rd Test Match : घरच्या मैदानावर भारतीय संघाचं जिंकणं सवयीचं झालेलं असताना विदेशात सर्वसाधारण कामगिरी असणाऱ्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ३-० चीतपट करण्याची किमया साधली. भारतात येऊन एखादी कसोटी जिंकणंही अवघड असताना न्यूझीलंडने मालिकेतल्या तिन्ही कसोटी जिंकत अविश्वसनीय असा विजय मिळवला आहे. दमदार सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडच्या सर्वोत्तम कामगिरीइतकंच भारताचा ढिसाळ खेळ या पराभवासाठी कारणीभूत ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फिरकीचं बूमरँग –
भारतात जाऊन जिंकायचं असेल तर फिरकीचं अस्त्र परजावं लागेल हे न्यूझीलंडने अचूक ओळखलं. एझाझ पटेल, मिचेल सँटनर, ग्लेन फिलीप्स या त्रिकुटावर न्यूझीलंडने फिरकीची धुरा सोपवली. या त्रिकुटाच्या साथीला रचीन रवींद्र आणि इश सोधी हेही आले. भारतीय फिरकीपटूंसमोर शेरास सव्वाशेर ठरत न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. एझाझ पटेल (१५), मिचेल सँटनर (१३), ग्लेन फिलीप्स (८) यांनी खेळपट्टीचा नूर ओळखून गोलंदाजी केली. पुण्यात संधी मिळालेल्या सँटनरने विकेट टू विकेट गोलंदाजी करताना चेंडूच्या वेगात हुशारीने बदल केले.
आयपीएलच्या निमित्ताने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या मिचेल सँटनरला भारतीय खेळपट्यांची चांगली माहिती आहे. या तपशीलांचा अचूक उपयोग करत सँटनरने फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. एझाझ पटेल मुंबईतल्या जोगेश्वरीचा. त्याचे कुटुंबीय न्यूझीलंडला स्थायिक झाले. मुंबईतल्या फिरकीला अनुकूल खेळपट्यांवर कशी गोलंदाजी करावी याचा वस्तुपाठ एझाझने दोन वर्षांपूर्वी देत डावात १० विकेट्स पटकावण्याची किमया केली होती. त्याचा कित्ता गिरवत एझाझने वानखेडे स्टेडियमवर सामन्यात १० विकेट्स पटकावत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. ग्लेन फिलीप्स हा तांत्रिकदृष्ट्या कामचलाऊ फिरकी गोलंदाज आहे. पण उसळी मिळणाऱ्या खेळपट्यांचा फायदा उठवत फिलीप्सने सातत्याने भागीदाऱ्या फोडल्या. विकेट पटकावण्यात वाकबगार फिलिप्ससमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. या त्रिकुटाने मिळून ३ सामन्यात ३६ विकेट्स पटकावल्या. भारतीय फलंदाज फिरकी खेळू शकतात हा निव्वळ भ्रम असं धाडसी वक्तव्य न्यूझीलंडचा माजी गोलंदाज आणि समालोचक सायमन डूलने केलं होतं. डूलचं विधान खरं असल्याचं मालिकाअखेर सिद्ध झालं. सँटनर-एझाझ-फिलीप्स यांच्यापेक्षा अव्वल फिरकीपटू भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतात. सँटनर-एझाझ म्हणजे वॉर्न आणि मुरलीधरन नाही पण अचूक, शिस्तबद्ध आणि फसव्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं.
विराट-रोहित अपयशी –
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघाचे आधारस्तंभ. वर्षानुवर्ष विराट कोहली हा टीम इंडियासाठी रनमशीन होता. मात्र या मालिकेत विराटची बॅट रुसली ती रुसलीच. विराटला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विराटला बाद करण्याची क्लृप्ती प्रतिस्पर्धी संघाने हुडकली आणि तिथेच भारतीय संघाच्या पराभवाचा पाया रचला गेला. विराटला ३ कसोटीत ६ डावात मिळून ९३ धावाच करता आल्या.
कर्णधार रोहित शर्माकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. घरच्या मैदानावर तडाखेबंद फटकेबाजी करणाऱ्या रोहितला न्यूझीलंडने वेसण घातली. टप्पा पडून आत येणारा चेंडू तसंच विचित्र उसळी मिळणाऱ्या चेंडूवर रोहित बाद होताना दिसला. सलामीवीर या नात्याने मोठी खेळी करू न शकल्याने रोहितचं अपयश टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलं. बाकी फलंदाजांच्या तुलनेत विराट आणि रोहितकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय खेळपट्यांवर ते लीलया खेळतात पण या मालिकेत या जोडगोळीला एकत्र आलेलं अपयश भारतासाठी नामुष्की ओढवणाऱ्या पराभवात रुपांतरित झालं. रोहित या मालिकेत ३ सामन्यात मिळून ९१ धावाच करू शकला.
१४ भोपळे, आततायी फटके आणि निरर्थक रनआऊटस –
कसोटी क्रिकेट कसोटी पाहतं असं म्हटलं जातं. ऑफस्टंपबाहेरचे चेंडू सोडणं, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, वाईट चेंडूंवर प्रहार करणं असं कसोटी सामन्यात खेळणं अपेक्षित असतं. बंगळुरू कसोटीत ढगाळ वातावरणात मॉट हेन्री, टीम साऊदी आणि विल्यम ओ रुक यांच्यासमोर भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले. भारताचा डाव ४६ धावांतच आटोपला. अवघ्या ३१.२ षटकात भारताचा डाव आटोपला.
पुण्यात भारतीय संघाचा डाव ४५.३ षटकात १५६ धावांतच गडगडला. दुसऱ्या डावात किंचित सुधारणा करत भारतीय संघाने २४५ धावांची मजल मारली. पण तरी त्यांना ६० षटकंच खेळता आली. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघाने २६३ धावांची मजल मारली पण दुसऱ्या डावात १४७ धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव २९.१ षटकात १२१ धावांतच संपुष्टात आला. परिस्थितीनुरूप खेळण्याची क्षमता काही अपवाद सोडले तर कुणीच दाखवली नाही.
टी२० प्रकाराचा पगडा असलेल्या भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करण्याची इच्छा दिसली नाही. परिस्थिती अनुकूल नसताना सत्र खेळून काढणं गरजेचं असतं पण या मालिकेत भारतीय फलंदाज प्रचंड घाईत दिसले. प्रत्येकाच्या खेळात बाद होण्याची घाई दिसत होती. कुठल्याही चेंडूवर बाद होऊ शकतो असा त्यांचा पवित्रा होता.
स्वत:च्या विकेटचं महत्त्व न जाणणाऱ्या भारतीय फलंदाजांनी अगदी सहज विकेट फेकल्या. मालिकेदरम्यान पुणे कसोटीत ऋषभ पंत तर मुंबई कसोटीत विराट कोहली धावबाद झाला. दिवसाचा खेळ संपायला आलेला असताना, धोका पत्करण्याची काहीही गरज नसताना धावबाद होणं अनाकलनीय आहे.
या मालिकेत न्यूझीलंडचा एवढा दबदबा होता की तब्बल १४ वेळा भारतीय फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. मोठी खेळी करणं दूर राहिलं, साधं खातं उघडणंही भारतीय फलंदाजांना अवघड झालं.
स्वीप, रिव्हर्स स्वीपने किवींना तारलं –
भारतीय फलंदाज धारातीर्थी पडत असताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी स्वीप, रिव्हर्स स्वीपचा अवलंब करत फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या. ऑफस्टंपच्या बाहेरून तसंच टप्पा पडायच्या आधीच चेंडूला तटवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम सातत्याने स्वीपचा फटका खेळतो. या दौऱ्यातही त्याने या फटक्यावरची हूकूमत दाखवली. पुणे कसोटीत ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत लॅथमने संघाच्या विजयाचा पाया रचला. रचीन रवींद्रकडे आंतरराष्ट्रीय स्तराचा मर्यादित अनुभव आहे पण त्याने २ आठवडे चेन्नईत घाम गाळून सराव केला. फिरकीसमोर तो डगमगला नाही. त्याच्या शतकी खेळीने अख्ख्या न्यूझीलंड संघालाच आत्मविश्वास दिला. विल यंगने त्याच्या तंत्रकौशल्यात सुधारणा केल्याचं दिसून आलं. केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने विल यंगला अंतिम अकरात संधी मिळाली. विलने या संधीचं सोनं केलं. २४४ धावांसह विलला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. विलने शतक झळकावलं नाही पण उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. डेव्हॉन कॉनवे, डॅरेल मिचेल यांनी रिव्हर्स स्वीपचा खुबीने वापर करत रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांचा प्रतिकार केला. मिचेलला मालिकेदरम्यान आपण प्रतिआक्रमण करू शकतो हेही दाखवून दिलं.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट? VIDEO व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण
प्रचंड उकाडा, आर्द्रतेचा समर्थपणे केला सामना –
न्यूझीलंड हा देश सुखद तापमानासाठी ओळखला जातो. या मालिकेदरम्यान पाऱ्याने पस्तिशी ओलांडली. काही वेळेला फील्स लाईक चाळिशीच्या पार दाखवत होतं. मुंबईत आर्द्रताही प्रचंड असल्याने खेळणं अतिशय कठीण होतं. दर तीन षटकांनंतर पाणी, एनर्जी ड्रिंक, सुकं खाणं असा पुरवठा न्यूझीलंडच्या राखीव खेळाडूंनी केला. ड्रिंक्स ब्रेकदरम्यान दमलेल्या खेळाडूंकरता खुर्च्या तसंच छत्र्या नेल्या जात होत्या. डॉक्टर, फिजिओ हे सातत्याने खेळाडू डिहायड्रेट होणार नाहीत याची काळजी घेत होते. काही खेळाडू औषधं घेत खेळताना दिसले. घामामुळे पायात गोळे येणे, थकवा, पेटगा असे त्रास होऊनही न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. उष्णता आणि आद्रर्तमुळे जर्सीचा घामाने चिखल होत असतानाही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी झेल घेणं, धावबाद करणं, धावा वाचवणं थांबवलं नाही. न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयात अंतिम अकरातल्या खेळाडूंइतकंच राखीव खेळाडूंचं तसंच सपोर्ट स्टाफचं मोलाचं योगदान आहे.