India vs New Zealand, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३चा पहिला उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मुंबईत सराव करत आहेत. दरम्यान, उपांत्य फेरीपूर्वी १९८३च्या विश्वचषकात टीम इंडियाला जेतेपद मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या टीम इंडियाच्या खेळाडूंवर जोरदार हल्ला चढवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल देव म्हणाले की, “आजच्या खेळाडूंना माझ्या सल्ल्याची गरज नाही. खरेतर, जेव्हा खेळाडू विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी तयारी करतात, तेव्हा ते मोठ्या खेळाचा भाग होण्याच्या मानसिक दडपणाला तोंड देण्यासाठी कणखर झालेले असतात. विश्वचषक सुरु होण्याआधी अनुभवी खेळाडूंचा सल्ला घेतात. आता टीम इंडियाने अशी विलक्षण कामगिरी केली आहे की, त्यांना कुठलाही सल्ला देण्याची गरज नाही. फक्त त्यांनी कुठलेही दडपण न घेता सामन्यात खेळावे एवढेच मी म्हणेन.” अशाप्रकारे माजी चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: IND vs NZ Semi-final: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी ICCने समालोचन पॅनेलची केली घोषणा; जाणून घ्या संपूर्ण यादी

सध्याच्या टीम इंडियातील खेळाडूंवर कपिलची प्रतिक्रिया

टीआरएस क्लिपवर कपिल देव यांना रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. कपिलला विचारण्यात आले की, “२०२३च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची खेळी पाहताना तुम्ही नॉस्टॅल्जिक झाले आहेत का?” यावर अनुभवी भारतीय अष्टपैलू खेळाडूने कबूल केले की, “सध्याच्या भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूने त्याला कधीही नॉस्टॅल्जिक केले नाही. तसेच, सध्याच्या संघातील कोणत्याही खेळाडूने मदत किंवा सल्ल्यासाठी बोलावले नाही. मला त्यांची जागा घ्यायची नाही.” ते पुढे म्हणाले, “मला त्यांना ‘असे खेळा, हे करा किंवा ते करा’ असे अजिबात सांगायचे नाही. मला फक्त आताच्या संघापासून स्वतःला वेगळे ठेवायचे आहे. मला फक्त त्यांना चांगले खेळताना बघायचे आहे.”

कपिल देव हे शमी-बुमराहच्या गोलंदाजीचे चाहते झाले

कपिल पुढे म्हणाले की, “जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यांनी शानदार गोलंदाजी केली आहे. मी अजून त्यांना काहीही सांगू शकत नाही. मी त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकू इच्छित नाही. ही मुले खूप हुशार आहेत, आम्ही त्यांच्याइतके सरस नाही. त्यांना आमच्यासारख्या लोकांची गरज नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. आम्ही फक्त त्यांना अधिक चांगले होण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो.”

हेही वाचा: IND vs NZ: केन विल्यमसनने सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाबाबत केले सूचक विधान; ‘द अंडरडॉग’वर म्हणाला, “आमच्यासाठी हे आव्हान…”

कपिलने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आणि म्हणाला, “मला वाटते शमी अविश्वसनीय गोलंदाजी करत आहे, त्याला सलाम. बुमराह त्याच्या अ‍ॅक्शनने अतिशय शानदार गोलंदाजी करत आहे. त्याचा इकॉनॉमी रेट चांगला असून त्यात तो विकेट्स देखील घेत आहे. त्याची गोलंदाजीची कृती असामान्य आहे. त्याच्या गोलंदाजीने विरोधी संघांच्या फलंदाजांमध्ये धडकी भरते. शमी आणि बुमराहच्या जोडीने २०२३च्या विश्वचषकात अफलातून गोलंदाजी केली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz these players are very smart we are not better than them kapil dev on current indian team avw