IND vs NZ Tim Southee breaks Virender Sehwag record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरु येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४०२ धावा करत पहिल्या डावाच्या जोरावर ३५६ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रचिन रवींद्रने शतक झळकावले. त्याला साथ देताना टीम साऊदीने पण जोरदार फटकेबाजी केली. त्याने अर्धशतक झळकावत भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडला आहे.

टिम साऊदीने मोडला वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम –

टिम साऊदी हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी तो कसोटीतही भरपूर षटकार मारतो. त्याने आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले आहेत. यासह त्याने ९२ षटकारांचा टप्पा गाठला आहे. आज त्याने बंगळुरूमध्ये टीम इंडियाविरुद्ध तीन षटकार ठोकले आणि वीरेंद्र सेहवागच्या पुढे गेला आहे. वीरेंद्र सेहवागने आपल्या कसोटी कारकिर्दीत १०४ सामने खेळले असून त्याच्या नावावर ९१ षटकारांची नोंद आहे. म्हणजेच टिम साऊदीने सेहवागपेक्षा एक कसोटी कमी खेळला आहे असून त्याने सेहवागपेक्षा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

बेन स्टोक्सने मारलेत कसोटीत सर्वाधिक षटकार –

सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बेन स्टोक्स आहे. आतापर्यंत त्याने १०६ कसोटी सामने खेळले असून १३१ षटकार मारले आहेत. यानंतर न्यूझीलंडच्या बलाढ्य फलंदाजांपैकी एक असलेला ब्रेंडन मॅक्युलम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १०१ कसोटी सामन्यांमध्ये १०७ षटकार मारले आहेत. ॲडम गिलख्रिस्टने केवळ ९६ कसोटी सामन्यांमध्ये १०० षटकार मारले आहेत. या तीन फलंदाजांव्यतिरिक्त कोणीही १०० हून अधिक षटकार मारलेले नाहीत.

हेही वाचा – IND vs NZ : पहिल्या कसोटी सामन्यात संतापलेल्या रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ, VIDEO होतोय व्हायरल

टिम साऊदी स्टोक्स-मॅक्युलमच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या जवळ –

टिम साऊदी सध्या ३५ वर्षांच्या आसपास आहे. अशा स्थितीत तो आणखी किती वर्षे क्रिकेट खेळू शकतो हे पाहायचे आहे. तसेच, सध्या केवळ १०० षटकार मारणाऱ्या तीन फलंदाजांच्या क्लबमध्ये तो सामील होऊ शकतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल. तो या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आहे. जर त्याने १०० षटकार पूर्ण केले, तर तो दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांना मागे टाकेल. कॅलिसच्या नावावर कसोटीत ९७ तर गेलच्या नावावर ९८ षटकार आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: “विराटला ही जबाबदारी…”, कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माने केला मोठा खुलासा

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज :

  • १३१ – बेन स्टोक्स (इंग्लंड) १०५ सामन्यात
  • १०७ – ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) १०१ सामने
  • १०० – ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) ९६ सामने
  • ९८ – ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) १०३ सामने
  • ९७ – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) १६६ सामने
  • ९२ – टिम साऊदी (न्यूझीलंड) १०३ सामने
  • ९१ – वीरेंद्र सेहवाग (भारत/आयसीसी) १०४ सामने
  • ८८ – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) १३१ सामने