भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९१ धावा केल्या आणि न्यूझीलंडला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १८.५ षटकांत १२६ धावांवर आटोपला. त्तपुर्वी टीम साऊथीने हॅट्ट्रिक घेताना एक विश्वविक्रम केला आहे.

टीम साऊथीने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्ट्रिकने एका विशेष विश्वविक्रमाची बरोबरी केली. साऊथीने त्याच्या खात्यात ४ षटकात ३४ धावांत ३ विकेट घेतल्या. या तीनही विकेट त्याने डावाच्या शेवटच्या षटकात घेतल्या.

२०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्या, चौथ्या चेंडूवर दीपक हुडा आणि पाचव्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला बाद करत साऊथीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. साऊदीची टी-२० आंतरराष्ट्रीय मधील ही दुसरी हॅट्ट्रिक आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याच्या बाबतीत तो संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. साऊदीने याआधी २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिली हॅटट्रिक घेतली होती.

हेही वाचा – IND vs NZ: टी-२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा श्रेयस अय्यर ठरला २५वा फलंदाज, पाहा संपूर्ण यादी

साऊथीने या बाबतीत श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे. मलिंगाने देखील या फॉरमॅटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेतल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत साऊदी पहिल्या स्थानावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत १३२ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader