IND vs NZ Harbhajan Singh Unhappy With Spin Friendly Pitches : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताला मालिकेत ०-३ असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने घरच्या मैदानात क्लीन उडवण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या या पराभवानंतर माजी फिरकीपटू हरभजन सिंग संतापलेला दिसत होता. यावेळी त्याने खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघासाठी आपल्याच टर्निंग पिच शत्रू –

भारताच्या पराभवानंतर एक्स पोस्ट करताना हरभजन सिंगने लिहिले की, “भारतीय संघासाठी आपल्याच टर्निंग पिच शत्रू ठरत आहेत. संपूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करत आम्हाला पराभूत केल्याबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. टीम इंडियाला चांगल्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची गरज आहे, हे मी अनेक वर्षांपासून सांगत आहे. कारण या टर्निंग पिच प्रत्येक फलंदाजासाठी आव्हानात्मक ठरताना दिसत आहेत.”

ही परिस्थिती फिरकीसाठी खूप अनुकूल –

एएनआशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “ही परिस्थिती फिरकीसाठी खूप अनुकूल होती. जो खड्डा दुसऱ्यासाठी खणला होता, त्याच खड्ड्यात स्वत:च पडले. हे फक्त आजच झाले असे नाही, तर हे अनेक वर्षांनी घडत आहे. अशा खेळपट्ट्यांवर क्रिकेट सतत खेळले जाते आहे, जिथे सामने तीन-साडेतीन दिवसात संपतात. काही खेळपट्ट्या अशा आहेत, जिथे सामने फक्त दोन दिवसात संपले आहेत. जे या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटसाठी योग्य नसल्याचे दर्शवते आणि ज्यात कसोटी क्रिकेटचा आत्मा दिसून येत नाही.

हेही वाचा – IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित

मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत रोहित शर्मा आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने फिरकी ट्रॅकची मागणी केल्याचे वृत्त होते. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर फारसे वळण नव्हते, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चेंडू अशा प्रकारे वळला की भारत आपल्याच जाळ्यात अडकला. ज्यामुळे मुंबई कसोटीत टीम इंडियासाठी १४७ धावांच्या लक्ष्य देखील खूप मोठे ठरले.

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंत आऊट की नॉट आऊट? VIDEO व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारताच्या या पराभवासोबतच कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याला कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारून जास्त वेळ झालेला नाही, पण मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा तो भारताचा दुसरा कर्णधार ठरला आहे. होय, या यादीत त्याने कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे.