India vs New Zealand ICC Cricket World Cup 2023 Match Updates: वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल. खरं तर, विराट कोहली असो की रोहित शर्मा, या दोन महान फलंदाजांच्या बॅटमधून आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात धावा येत नाहीत. एवढेच नाही तर मधल्या फळीतील सर्वात मजबूत दुवा असलेला केएल राहुल उपांत्य फेरीतही अपयशी ठरला आहे. पण भारताच्या या तीन खेळाडूंना वानखेडेमध्ये नवा इतिहास लिहावा लागेल.
सर्वप्रथम, रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माची उपांत्य फेरीतील कामगिरी खराब राहिली आहे. रोहित शर्माने २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्याला आपला डाव ३४ धावांच्या पुढे वाढवता आला नाही. २०१९ मध्ये, रोहित शर्मा फक्त १ धाव घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
टीम इंडियासाठी प्रमुख खेळाडूंना खेळावी लागणार मोठी खेळी –
केएल राहुलने आतापर्यंत फक्त एकच सेमीफायनल सामना खेळला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात राहुलच्या बॅटनेही एकाहून अधिक धावा केल्या नाहीत. एक मात्र नक्की की टीम इंडियाला वानखेडेवर विजय मिळवायचा असेल, तर या प्रमुख खेळाडूंना मोठी खेळी खेळावी लागणार आहे. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, सध्या जगातील नंबर वन फलंदाज चौथा विश्वचषक खेळत आहे. विराट कोहली देखील भारतासाठी भाग्यवान आहे. कारण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीपासून टीम इंडिया प्रत्येक वेळी उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. पण विराट कोहलीच्या बॅटने उपांत्य फेरीत नेहमी निराशा केली आहे.
उपांत्य फेरीतील विराट कोहलीचा कामगिरी –
विराट कोहलीने एकदिवसीय विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. यामध्ये तो सपशेल अपयशी ठरला आणि केवळ ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून फक्त एक धाव आली होती. २०१९ मध्येही न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीला केवळ १ धाव करता आली होती.