Virat Kohli breaks Sachin Tendulkar most Runs record in World Cup 2023:  भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. कोहलीने बुधवारी (१५ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ८० धावा करून ही कामगिरी केली. विराटने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटने न्यूझीलंडविरुद्ध ११७ धावांची इनिंग खेळली होती. विराटच्या सध्याच्या विश्वचषकात ७११ धावा झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनने २००३ विश्वचषकात ११ डावात ६७३ धावा केल्या होत्या. कोहलीने विश्वचषकातील १० डावांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिनने २००३ मध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकं झळकावली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल त्याला सुवर्ण बॅट मिळाली. तेंडुलकरच्या शानदार खेळीमुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, पण विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

खेळाडूदेशवर्षडावधावा
विराट कोहलीभारत२०२३१०७११
सचिन तेंडुलकरभारत२००३११६७३
मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलिया२००७१०६५९
रोहित शर्माभारत२००७६४८
डेव्हिड वॉर्नरऑस्ट्रेलिया२०१९१०६४७

कोहलीने सचिनचा आणखी एक विक्रम मोडला

विराटने आठव्यांदा वर्ल्ड कपमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडले. २००३च्या विश्वचषकात सचिनने सात वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावांची इनिंग खेळली होती. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनने २०१९च्या विश्वचषकात सात वेळा अशी कामगिरी केली होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९ विश्वचषक स्पर्धेत प्रत्येकी सहा वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला.

हेही वाचा: IND vs NZ: “खेळपट्टी सर्वासाठी सारखी असते त्यावर…”, सुनील गावसकरांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिले उत्तर

विराटने संगकाराला मागे टाकले, पाँटिंगच्या बरोबरीने पोहोचला

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१७व्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या बाबतीत त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने २१६ वेळा अशी कामगिरी केली. सचिन तेंडुलकर (२६४) त्याच्या पुढे आहे. रिकी पाँटिंगनेही २१७ वेळा अशी कामगिरी केली आहे.