Virat Kohli Completes 15000 Runs at Number 3 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या. पहिल्या डावात ४६ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दमदार कमबॅक केले. भारताचा सलामीने जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. ज्यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद २३१ धावा केल्या. यादरम्यान स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा पराक्रम केला. त्याने कसोटी क्रिकेटमधील ९००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर त्याने राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला आहे.

विराट कोहली तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ७० धावा करत बाद झाला. त्याने या अर्धशतकी खेळीत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. कोहलीने ५३ धावा पूर्ण करताच कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या. कसोटीत ९००० धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. कोहलीपूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांनी ही मोठी कामगिरी केली होती. त्याचबरोबर सर्वात जलद ९ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय फलंदाज आहे. १९७ डावात त्याने ही विशेष कामगिरी आपल्या नावे केली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज –

१५९२१ – सचिन तेंडुलकर (५३.७८ सरासरी)
१३२८८ – राहुल द्रविड (५२.३१ सरासरी)
१०१२२ – सुनील गावस्कर (५१.१२ सरासरी)
९००* – विराट कोहली (४८.९० सरासरी)
८५८६ – वीरेंद्र सेहवाग (४९.३४ सरासरी)

हेही वाचा – PAK vs ENG : बॅट उडाली, विकेट गेली, कॅप्टन गेला, सामनाही गेला…बेन स्टोक्स अनोख्या पद्धतीने झाला बाद; VIDEO व्हायरल

विराट कोहलीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम –

या अर्धशतकी खेळीत विराट कोहलीने एक मोठा विक्रमही केला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना १५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने राहुल द्रविडला मागे टाकले आणि तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या बाबतीत राहुल द्रविडला मागे टाकले आहे.

हेही वाचा – IND vs NZ : रोहित शर्माने सलामीवीर म्हणून केला मोठा पराक्रम! विराटच्या साथीने मोडला गांगुली-द्रविडचा विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (डाव) :

२२८६९ – रिकी पाँटिंग (५४०)
२२०११ – कुमार संगकारा (४६८)
१५६९६ – केन विल्यमसन (३३७)
१५००९ – विराट कोहली (३१६)*
१४५५५ – राहुल द्रविड (३२९)
११२३६ – जॅक कॅलिस (२८३)