IND vs NZ Washington Sundar clean bowled Rachin Ravindra and Tom Blundell : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. किवी संघाने मालिकेत आधीच १-० अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेत अजिंक्य आघाडी मिळवण्याचे निर्धाराने प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला वॉशिंग्टन सुंदरने मागील सामन्यातील हिरो रचिन रवींद्रचा त्रिफळा उडवत मोठा धक्का दिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो १०५ चेंडूत ६५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे न्यूझीलंडला चौथा धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वॉशिंग्टनने भारताचा मोठा अडथळा दूर केला –

न्यूझीलंड संघाच्या पहिल्या डावातील ६० व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आला होता. त्याने या षटकातील पहिल्या चेंडूवर मागील सामन्यासाठी भारतासाठी कर्दनकाळ ठरलेल्या रचिन रवींद्रला क्लीन बोल्ड करत भारताचा मोठा अडथळा दूर केला. रचिन रवींद्रने बाद होण्यापूर्वी १०५ चेंडूचा सामना करताना ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७५ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा – IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल

वॉशिंग्टन सुंदरने रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेलला केले बोल्ड –

वॉशिंग्टन सुंदरने सलग दुसऱ्या षटकात म्हणजे ६२ व्या षटकात न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. त्याने रचिन रवींद्रप्रमाणे टॉम ब्लंडेलला क्लीन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. तो ३ धावा करुन माघारी परतला. अशा प्रकारे वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन षटकात विकेट घेतल्याने न्यूझीलंडची ६२ षटकांत ५ विकेट गमावत २०१ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs NZ : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी! कर्दनकाळ रचिन रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेलचाही उडवला त्रिफळा, पाहा VIDEO

१३२९ दिवसांनी कसोटीत घेतली पहिली विकेट –

मार्च महिन्यात इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यात वॉशिंग्टन सुंदरने २०२१ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता आणि त्याने आज कसोटी संघात पुनरागमन केले आहे. अशा स्थितीत पुणे कसोटी सामन्यात जेव्हा त्याने रचिन रवींद्रला शानदार ऑफ-स्पिन चेंडूने क्लीन बोल्ड केले, तेव्हा त्याला १३२९ दिवसांनी पहिली विकेट मिळाली. चौथ्या विकेटसाठी रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांच्यातील धोकादायक भागीदारी तोडण्याचे काम सुंदरने केले. रवींद्रला ६५ च्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याबरोबरच, सुंदरने लवकरच टॉम ब्लंडेलच्या रूपात न्यूझीलंडला पाचवा धक्का दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz washington sundar gave a big blow to new zealand by clean bowled rachin ravindra and tom blundell video viral vbm