India vs New Zealand World Cup 2023 Live Streaming: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा पाचवा सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे. किवी संघानेही या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही आणि सलग चार सामने जिंकले आहेत. आता हे दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. यजमान भारत संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे, पण न्यूझीलंड संघाला कमी लेखता येणार नाही.
२००३ पासून भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचाही समतोल ढासळला आहे. या सामन्यात भारताच्या मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि संधी मिळाल्यावर शानदार कामगिरी करण्यास उत्सुक असतील. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनही केवळ एक सामना खेळल्यानंतर दुस-यांदा दुखापतग्रस्त झाला आणि तो स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. मात्र, त्याच्या न खेळल्याने संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. अशा स्थितीत दोन्ही संघांमधील लढत खूपच रंजक असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे संघ या विश्वचषकाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम संघ आहेत आणि दोघांनी ४-४ सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला आहे, तर न्यूझीलंड संघाने इंग्लंड, नेदरलँड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे तर न्यूझीलंडचे नेतृत्व केन विल्यमसनकडे आहे, जरी विल्यमसन तंदुरुस्त नसताना टॉम लॅथमनेही काही सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड हेड टू हेड
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ११६ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने ५८ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत, ७ सामन्यांचा निकाल लागला नाही तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या ५५ सामन्यांपैकी भारताने २९ जिंकले आहेत तर २६ सामने गमावले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १६ जून १९७५ रोजी खेळला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंडने ४ गडी राखून विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची वन डे २४ जानेवारी २०२३ रोजी खेळली गेली, ज्यामध्ये भारताने ९० धावांनी विजय मिळवला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी
एकूण सामने: ११६
भारत जिंकला: ५८
न्यूझीलंड जिंकला: ५०
रद्द: ७
बरोबरी सुटला: १
हा सामना कुठे, कधी आणि कसा पाहू शकणार?
वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कधी होणार?
भारत विरुद्ध बांगलादेश सामना रविवारी (२२ ऑक्टोबर) होणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कोठे होणार आहे?
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे.
वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना किती वाजता सुरू होईल?
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी दीड वाजता नाणेफेक होईल.