India vs New Zealand, World Cup 2023: दुखापतीमुळे हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर आहे. अशा स्थितीत आता त्याच्या जागी भारतीय संघाच्या प्लेईंग-११मध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश होणार, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. वास्तविक, न्यूझीलंड २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्यांनी आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. या अवघड स्थितीत हार्दिकच्या जागी संघात कोणाचा समावेश करायचा, याबाबत भारताला गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धरमशाला येथे होणार आहे. माहितीसाठी की, धरमशालाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करते आणि फलंदाजही येथे चांगली फलंदाजी करू शकतात. अशा स्थितीत हार्दिकच्या जागी फलंदाजाला उतरवायचे की शमीला संधी द्यायची या संभ्रमात संघ व्यवस्थापन असेल. रोहितच्या मते, हार्दिकची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र, संघ त्याच्याबाबतीत कोणतीही जोखीम पत्करणार नाही कारण, प्रत्येक संघाला विश्वचषकात ९ साखळी सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला विश्रांती दिली जाऊ शकते. असे झाले तर कोणाला संघात संधी मिळणार? यासाठी तीन खेळाडू रांगेत आहेत.

हेही वाचा: Denmark Open: भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधूची शानदार कामगिरी! इंडोनेशियन खेळाडूला पराभूत करत केला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हार्दिकच्या जागेसाठी तीन खेळाडूंनी ठोकली दावेदारी

धरमशाला येथे हा सामना होणार असल्याने अशा स्थितीत हार्दिकच्या जागी कोणाचा समावेश करायचा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. धरमशालाची खेळपट्टी पाहून संघ व्यवस्थापन असा निर्णय घेऊ शकते की, न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. शमी अद्याप विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही. दुसरीकडे, भारतीय संघ हार्दिकच्या जागी अतिरिक्त फिरकीपटूवरही दाव खेळू शकतो. न्यूझीलंडचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करू शकतात. हा विचार लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन अश्विनला संधी देऊ शकते.

इशान किंवा सूर्यकुमार यादव

हार्दिकच्या जागी इशान किशनला संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला अद्याप संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत संघ व्यवस्थापन हार्दिक ऐवजी फलंदाजाबरोबर या सामन्यात जावू शकते. रोहित गोलादाजाबरोबर जातो की फलंदाजाबरोबर हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वास्तविक, हार्दिक सारखी गोलंदाजी करणारा शार्दुल ठाकूर आधीच संघात आहे. पण फलंदाजीत शार्दुलने मोठी कामगिरी केलेली नाही. अशा स्थितीत रोहित हार्दिकला न्यूझीलंडविरुद्ध एखाद्या फलंदाजाचा पर्याय निवडण्याची शक्यता जास्त आहे.

हेही वाचा: IND vs BAN: पुण्यनगरीत कोहलीचे ‘विराट’पर्व! अनोख्या शतकासाठी अंपायरने नाही दिला वाईड बॉल, मेहदी हसन मिराजचा रडीचा डाव

शार्दुल हा मोठा सामनावीर आहे- रोहित शर्मा

नुकताच एका व्हिडीओमध्ये रोहित शर्माने शार्दुलबाबत मोठे विधान केले आहे. ज्यामध्ये शुबमन गिल कर्णधार रोहितबरोबर शार्दुलच्या फलंदाजीबद्दल विनोद करत आहे. ज्यावर कर्णधार रोहितने प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, “शार्दुल एक मोठा सामनावीर आहे. गोलंदाजीसह तो फलंदाजीतही चांगली कामगिरी करू शकतो.” रोहित आणि शुबमन यांच्यातील हा विनोद भारतीय चाहते एक इशारा म्हणून घेऊ शकतात.

Story img Loader