IND Vs NZ : युजवेंद्र चहल त्याच्या पत्नीशी म्हणजेच धनश्रीशी घटस्फोट घेतल्याने मागच्या महिन्यात चर्चेत होता. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचं कारणही तसंच आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्यात युजवेंद्र चहलसह एक मिस्ट्री गर्ल दिसली आहे.

दुबईत युजवेंद्र चहलसह दिसली मिस्ट्री गर्ल

भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमध्ये आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईत खेळला जातो आहे. या सामन्यात युजवेंद्रसह एक मिस्ट्री गर्ल दिसून येते आहे. युजवेंद्र आणि या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ही मिस्ट्री गर्ल कोण आहे. कारण तिची ओळख पटली आहे.

कोण आहे युजवेंद्रसह दिसणारी मिस्ट्री गर्ल?

युजवेंद्रसह दिसणारी मिस्ट्री गर्ल दुसरी-तिसरी कुणी नाही तर आर.जे. माहवाश आहे. आर. जे. माहवाशचं आणि युजवेंद्र चहलचं अफेअर सुरु आहे अशाही बातम्या समोर आल्या होत्या. धनश्री आणि युजवेंद्र यांचा घटस्फोट झाला त्या दोघांमध्ये पटत नाही अशा बातम्या त्याआधी आल्या होत्या. त्या काळातही युजवेंद्र आणि माहवाश या दोघांना अनेकांनी एकत्र पाहिलं होतं. आता दुबईतल्या महाअंतिम फेरीत युजवेंद्र आणि माहवाश हे दोघंही दिसले आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

कोण आहे आर. जे. माहवाश?

आरजे माहवाश दिल्लीतली एक रेडिओ जॉकी आहे. त्याशिवाय ती सोशल मीडिया कंटेट क्रिएटरही आहे. तिचा आवाज मोहक आहे. तसंच तिची शैलीही जरा हटके आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर माहवाशचे १.४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. असंही सांगितलं जातं की नेटफ्लिक्सच्या एका वेबसीरिजमध्ये काम करण्याची ऑफर तिला मिळाली होती. त्याचप्रमाणे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा झाली होती. पण या दोहोंमध्ये ती कुठल्याश्या कारणांमुळे जाऊ शकली नाही.

Who Is The Mystery Girl Spotted With Yuzvendra Chahal ?
युजवेंद्र चहलसह दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?

युजवेंद्र आणि माहवाश यांची चर्चा का?

डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या दरम्यान युजवेंद्र आणि माहवाश यांना लोकांना डिनर डेटवर पाहिलं होतं. त्यानंतर एका पार्टीतही हे दोघं एकत्र दिसले होते. आता हे दोघं पुन्हा एकदा दुबईत दिसले आहेत. त्यामुळे युजवेंद्र बरोबर दिसणारी मुलगी ही कुणी मिस्ट्री गर्ल नाही तर ती आर.जे. माहवाश आहे हे स्पष्ट झालं आहे. Cricket.one या वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader