Who is William O’Rourke: भारत वि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय भारतासाठी सपशेल चुकीचा ठरला. भारताचे पाच फलंदाज तर डकवर खातेही न उघडता बाद झाले. भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम न्यूझीलंडचा नवा गोलंदाज विल्यम ओ रुकने केलं. अशारितीने विल्यम ओ रुकचे ४ विकेट्स आणि मॅट हेन्रीच्या ५ विकेट्सच्या भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. भारताने घरच्या मैदानावर कसोटीत नोंदवलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पण भारताला धक्का देणारा हा न्यूझीलंडचा नवा गोलंदाज विल्यम ओ रुक आहे तरी कोण, जाणून घेऊया.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरू येथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात साडेसहा फूट उंचीच्या खेळाडूने टीम इंडियाचा धुव्वा उडवला. लंडनमध्ये जन्मलेल्या विल्यम ओ’रुर्कने भारतीय फलंदाजांसाठी काळ ठरला. विल्यमने विराट कोहलीला डकवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

हेही वाचा – IND vs NZ : भारताचा ४६ धावांत खुर्दा; हेन्री-विल्यमसमोर लोटांगण

पहिल्या सत्रात भारताने अवघ्या ३४ धावांत आपले सहा मोठे विकेट गमावले. ओ रूकने पहिल्या सत्रात सलामीवीर यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि केएल राहुल यांना बादल केलं. कोहली आणि राहुल यांना खातेही उघडता आले नाही. तर जैस्वालने ६३ चेंडूत १३ धावा केल्या. लंचब्रेकपूर्वी, न्यूझीलंडच्या या तुफानी गोलंदाजाने ८ षटकं टाकली, ज्यामध्ये चार मेडन्स होत्या.

हेही वाचा – IND vs NZ : विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम; उंचपुऱ्या तरण्याबांड गोलंदाजाने दाखवला तंबूचा रस्ता

कोण आहे विल्यम ओ रुक

फेब्रुवारी २०२४ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओ रुकच्या कारकिर्दीतील हा पाचवा कसोटी सामना आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ६ ऑगस्ट २००१ रोजी लंडनमध्ये जन्मलेल्या ओरूकचे वडील पॅडी हे वेगवान गोलंदाज होते. त्याचे काका मॅथ्यू हे देखील क्रिकेटपटू होते. ओ रूकचे कुटुंब त्यांच्या जन्मापूर्वी इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते आणि जेव्हा तो पाच वर्षांचा होता, तेव्हा त्यांचे कुटुंब न्यूझीलंडला परत आले आणि ऑकलंडमध्ये स्थायिक झाले.

मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड अ संघात त्याची निवड करण्यात आली तेव्हा ओ रूकची कामगिरी पहिल्यांदा प्रकाशझोतात आली. ही निवड त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामुळे त्याला प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पण केले. जिथे त्याने तीन सामन्यांत पाच विकेट घेतल्या, १९९० च्या दशकात रॉजर टूसेनंतर न्यूझीलंडकडून खेळणारा तो पहिला इंग्लंडमध्ये जन्मलेला क्रिकेटपटू बनला.

हेही वाचा – IND vs NZ : भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन मोठे बदल, शुबमनच्या जागी द्विशतकवीरला दिली संधी

सहा फूट चार इंच उंचीच्या विल्यम ओ रूकने क्रिकेटच्या मैदानात फार कमी वेळात स्वतःचे नाव कमावले आहे, त्याने आपल्या दमदार पदार्पणाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी, ओरूकने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पदार्पणात ओरूकने एकूण नऊ विकेट घेतल्या, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या कामगिरीने न्यूझीलंडच्या पदार्पणात घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. तर श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीतही त्याने पाच विकेट्स घेत आपल्या भेदक गोलंदाजीचा प्रत्यय दिला.

आता भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीतही त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. विल्यमने यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.