India vs New Zealand, World Cup 2023: सध्याच्या विश्वचषकात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाचवा सामना खेळणार आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. रविवारी (२२ ऑक्टोबर) होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ आहेत ज्यांनी आतापर्यंतच्या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. दोघांनी आपापले चारही सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत हा सामना खूपच रोमांचक असेल. मात्र, सामन्यावर पावसाचे सावट असून असे झाल्यास चाहत्यांची निराशा होऊ शकते.

विश्वचषक स्पर्धेत भारताचा शेवटचा पराभव न्यूझीलंडकडून झाला होता. किवी संघाने २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा १८ धावांनी पराभव केला. तो सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. भारतीय संघ या सामन्यात जेव्हा खेळायला उतरेल तेव्हा त्याचे लक्ष धावांचे लक्ष्य काय असावे यावर केंद्रित असेल. टीम इंडियाला २०१९ विश्वचषकाच्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव

सामन्यादरम्यान पावसाची शक्यता

मागच्या वेळी मँचेस्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकपचा ​​सामना जेव्हा झाला होता, तेव्हाही पावसाने त्या सामन्यात व्यत्यय आणला होता आणि दोन्ही संघांना राखीव दिवशी उर्वरित खेळ खेळवा लागला. पाऊस दोन्ही संघांची पाठ सोडत नसल्याचे यातून दिसत आहे. रविवारी धरमशाला येथे होणाऱ्या सामन्यातही पावसाची दाट शक्यता आहे. पावसाबरोबरच येथे वादळावाऱ्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात त्या ठिकाणी खूप पाऊस झाला आहे.

हेही वाचा: IND vs BAN: पुण्यनगरीत कोहलीचे ‘विराट’पर्व! अनोख्या शतकासाठी अंपायरने नाही दिला वाईड बॉल, मेहदी हसन मिराजचा रडीचा डाव

नाणेफेकीला विलंब होऊ शकतो

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार धरमशालेत दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत नाणेफेकीला उशीर होऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. शेवटी तो सामना ४३ षटकांपर्यंत कमी करण्यात आला होता. दोन्ही संघांसाठी आजचा दिवस खूप गारठा जाणवणारा असेल. तेथील कमाल तापमान १३ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तसेच ७४ टक्के ढगाळ वातावरण राहील. सायंकाळपर्यंत तापमानात घट होईल आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता १०० टक्के होईल.

नाणेफेकीमुळे सामना रद्द झाला तर?

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीच्या अटींमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामन्यासाठी ‘राखीव दिवस’ ची तरतूद नाही. रविवारचा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर भारत आणि न्यूझीलंड या दोघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत ही रंजकदार व्हावी हीच चाहत्यांची इच्छा आहे. याआधीही गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये पावसामुळे भारताचे दोन्ही सराव सामने रद्द करण्यात आले होते.

काय असेल रोहित शर्माची योजना?

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात फिरकीपटूंनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्यांचा संघ केवळ २८८ धावाच करू शकला होता. मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी आणि राशिद खान फिरकीच्या तिकडीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज फसले होते. या तिघांनी टाकलेल्या २८ षटकांत न्यूझीलंड संघ केवळ १४१ धावाच करू शकला आणि दोन विकेट्स गमावल्या. टीम इंडियाकडेही अप्रतिम फिरकीपटू आहेत. चायनामन रिस्ट स्पिनर कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रवींद्र जडेजाही शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडच्या फलंदाजांची पळताभुई थोडी करायची अशी रोहित शर्माची योजना असू शकते.

हेही वाचा: IND vs NZ: हार्दिकच्या जागी कोणत्या खेळाडूची लागणार टीम इंडियात वर्णी? एका जागेसाठी तीन स्पर्धक, जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

विश्वचषक स्पर्धेसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, इश सोधी, टिम साउदी, विल यंग.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.