Asia Cup 2022 IND vs PAK: भारत पाकिस्तान सामना हा जितका मैदानात रंगतो तितकाच मैदानाबाहेर असणाऱ्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढत जातो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघांचे समर्थक संधी कधी मिळतेय याची वाटच पाहत असतात. अशीच एक संधी साधून पाकिस्तानच्या माजी खेळाडूने सध्या टीम इंडियावर टीका केली आहे. सामन्याआधी शनिवारी, भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गजांच्या यजमानांनी दुबईमध्ये खेळाची उभारणी म्हणून एका टेलिव्हिजन चर्चेत पाकिस्तानचे माजी क्रिकेटर सिकंदर बख्त भारतीय संघाबद्दल एक वादग्रस्त दावा केला.

(आज पुन्हा ‘भारत-पाकिस्तान’ लढत; सामना कोठे आणि किती वाजता होणार? जाणून घ्या दोन्ही संघांचे Playing 11)

“भारत शारजाह किंवा अबुधाबीमध्ये का खेळू इच्छित नाही ते फक्त दुबईत खेळतात. आशिया चषक सामन्यात भारताचे सर्व सामने हे दुबई येथे पार पडले आहेत. पाकिस्तान विरुद्ध सामना सुद्धा शारजाह मध्ये होणार असताना तो बदलून भारतीय संघाने दुबईमध्ये ठेवण्यास भाग पाडले असे करण्यामागे कारण काय” असं विचारताना बख्त यांनी टीम इंडियाला शारजाह आणि अबू धाबी मध्ये खेळण्याची भीती वाटते का असा सवाल केला. कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन आणि अतुल वासन यांचा समावेश असलेल्या भारतीय दिगज्जांसह बख्त या चर्चेत बोलत होते.

बख्त यांच्या या सावळावर कपिल आणि अझरुद्दीन यांनी प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली नाही, तर अतुल वासन यांनी आनंदाने सांगितले की शारजाह पूर्वी भारतीय संघासाठी “यशस्वी मैदान” नव्हते. “ते मैदान आमच्यासाठी खूपच वाईट आहे. आता, आम्ही आयसीसीच्या भक्कम बाजूने आहोत, म्हणून आम्ही तेथे खेळत नाही,” अशी प्रतिक्रिया वासन यांनी देताच सर्व दिगज्जांमध्ये एकच हशा पिकला.

(स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…)

टीम इंडिया २०२२ आशिया चषकातील अव्व्ल ४ मधील पहिला सामना आज पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दुबईत गेल्या रविवारी झालेल्या अ गटातील लढतीत भारताने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. सामन्याच्या आधीच, दोन्ही बाजूंना मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला, तर वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहनीही पाकिस्तानसाठी खेळाला मुकणार आहे.

Story img Loader