Virat Kohli Asia Cup IND vs PAK: आशिया चषकातील बहुप्रतीक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सलग दोन वेळा रद्द होऊन अखेरीस आज कोलंबो मध्ये पार पडत आहे. पाकिस्तानने काल नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. पावसामुळे अर्धवट राहिलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज पुन्हा २४ व्या षटकापासून सुरु झाला. काल रोहित शर्मा आणि शुबमन गिलने सुद्धा दमदार सुरुवात केल्याने भारताची बाजू मजबूत दिसून येत होतीच पण आज विराट कोहली व के. एल. राहुलने अपेक्षेपेक्षा खूप पुढे नेऊन भारताची धावसंख्या ३५६ वर नेऊन ठेवली. पाकिस्तानच्या तगड्या गोलंदाजांसमोर फलंदाजीचे आव्हान पेलताना के. एल. राहुल व विराटने केलेल्या कामगिरीचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पण एका खास व्यक्तीने केलेलं कौतुक सध्या खूपच चर्चेत आहे.

मागील आयपीएलपासून विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर हा वाद खूपच पेटला होता. मध्यंतरी विराटच्या चाहत्यांना गंभीरने चुकीच्या पद्धतीने हातवारे केल्याने वाद अजूनच चिघळला होता. केवळ कोहलीच नव्हे तर के. एल राहुलच्या क्षमतेविषयी सुद्धा गंभीरने प्रश्न केले होते. पण आज दोघांच्या कमाल खेळीनंतर स्वतः गौतम गंभीरनेही कोहली व राहुलचे तोंडभर कौतुक केले आहे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?

नेमकं कोहलीच्या शतकपूर्तीच्या वेळी गौतम गंभीर सुद्धा कॉमेंट्री पॅनलवर होता, तेव्हाही त्याने कोहलीच्या खेळाचे कौतुक केले. तर मध्यंतरात सुद्धा गंभीर म्हणाला की, “विराट आणि के.एलने खूप दबावात खेळूनही खूप जबरदस्त गेम दाखवला आहे. त्यांनी जे केलं ते सोपं नव्हतं.या दोघांनी फॉर्ममध्ये परतणं हे भारताच्या आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने फायद्याचं आहे”

Video: विराट कोहलीचे शतक

IND vs Pak पूर्वी गौतम गंभीर काय म्हणाला?

दरम्यान, याआधी सुद्धा विराट कोहलीच्या २०१२ मधील सामन्याची आठवण काढून गौतम गंभीरने किंग कोहलीचे कौतुक केले होते. जेव्हा विराटने १८३ धावा केल्या तेव्हा रोहित शर्मा धावांच्या बाबत कोहलीच्या पुढे होता पण कोहलीने दबाव सांभाळून खूप उत्तम खेळीचे प्रदर्शन केले होते. विशेष म्हणजे याच २०१२ च्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यात गंभीर सुद्धा प्लेइंग ११ मध्ये होता मात्र धावांचं खातंही न खोलता तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

हे ही वाचा<< IND vs PAK: विराट कोहलीने शतक करताच डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट चर्चेत; वसीम जाफरने दाखवला स्क्रिनशॉट

दुसरीकडे, कोहलीच्या चाहत्यांनी अजूनही गौतम गंभीरवरचा राग सोडलेला नाही. सोशल मीडियावर सध्या गौतम गंभीरवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

Story img Loader