India A vs Pakistan A Emerging Asia Cup: भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याची चाहत्यांना कायमच आतुरता असते. याचदरम्यान सध्या सुरू असलेल्या इमर्जिंग आशिया कप २०२४ मध्ये या दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांचे एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू होते. दरम्यान भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह हे सलामीसाठी उतरले. दरम्यान अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानी गोलंदाज मैदानावर भिडताना पाहायला मिळाले.

भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने २२ चेंडूत ५ चौकार व २ षटकारासह ३५ धावांची खेळी केली. प्रभसिमरन सिंहच्या साथीने त्याने पॉवरप्लेमध्ये ६८ धावा केल्या. अभिषेक शर्माची विस्फोटक फलंदाजी पाहून पाकिस्तानी गोलंदाज चांगलेच गडबडले होते. पॉवरप्लेनंतर पाकिस्तानकडून सुफियान मुकीम फलंदाजीला आला.

पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य X/@Official_PIA)
Pakistan Airlines : पाकिस्तान एअरलाइन्सच्या वादग्रस्त जाहिरातीची होणार चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
Why Rohit Sharma Will Visit Pakistan Ahead of ICC Champions Trophy 2025 According To Reports
Champions Trophy: रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला का जावं लागणार? का सुरू आहे चर्चा? वाचा कारण
India successfully tests anti tank missile Nag Mk 2
शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
kisan kathore ganesh naik marathi news
Kisan Kathore : “ते बदलापूरचे नाही बेलापुरचे महापौर होतील”, आमदार कथोरे यांची वामन म्हात्रे यांच्यावर मार्मिक टीपणी

हेही वाचा – IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानवरील विजयापेक्षा रमणदीपच्या कॅचची चर्चा, बाऊंड्रीजवळ असा चित्तथरारक झेल कधीच पाहिला नसेल, VIDEO व्हायरल

सुफियान मुकीमने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. तो बाद होताच पाकिस्तानी गोलंदाजाने अभिषेक शर्माला त्याच्या अॅक्शनमधून मैदान सोडण्याचे संकेत दिले. जे अभिषेक शर्माला आवडले नाही. याशिवाय पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांही काहीतरी बोलताना दिसले. अभिषेक शर्मा शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता, मात्र तो अचानक थांबला आणि त्याने पाकिस्तानी खेळाडूंना प्रत्युत्तर दिले. पंच मध्ये आल्यानंतर अभिषेक शर्माने जाताना असा काही रागात एक कटाक्ष टाकला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी गमावली तर काय होणार? कसं असणार WTC फायनलचं समीकरण?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंह यांनी चांगलीच फटकेबाजी केली. दोघांनी मिळून सामन्याच्या सहाव्या षटकात खोऱ्याने धावा केल्या. या सामन्याच्या सहाव्या षटकात दोघांनी मिळून २५ धावा केल्या आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांवर चांगलाच दबाव टाकला. या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर अभिषेक शर्माने दोन चौकार मारले. यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर दोघांनी दोन षटकार ठोकले.

हेही वाचा – IND vs NZ: बंगळुरू कसोटीत झाला वाद, रोहित शर्मा पंचांवर भडकला, किवी फलंदाजही गेले मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?

अभिषेक शर्माची फटकेबाजी पाहून पाकिस्तानी कॅम्पमध्ये खळबळ उडाली आणि षटक सुरू असताना कर्णधाराने सर्वांना चर्चा करण्यासाठी जमवले. यानंतर पुढच्या चेंडूवर अभिषेकने धाव घेतली आणि प्रभसिमरन स्ट्राईकवर आला. प्रभासिमरनने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, अशारितीने दोघांनी २५ धावा केल्या. भारत-पाकिस्तान सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला पण यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय नोंदवला.

Story img Loader