IND vs PAK Abrar Ahmed on Shubman Gill Wicket Celebration: चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. विराट कोहलीचं शतक, शुबमन गिलची सातत्यपूर्ण खेळी, श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि भारताच्या गोलंदाजी विभागाच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या अबरार अहमदने टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलला क्लीन बोल्ड करून भुवई उंचावत डोळे दाखवले होते. त्यामुळे त्याची सेलिब्रेशन करण्याची पद्धत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आणि आता अबरार अहमदने या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघ पाकिस्तानने दिलेल्या २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहित शर्माच्या विकेटनंतर गिल आणि कोहलीने भारताचा डाव सावरला होता. दरम्यान डावाच्या १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अबरार अहमदने शुबमन गिलला क्लीन बोल्ड केले. यानंतर अबरारने गिलकडे पाहून भुवई उंचावत त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केला.
गिलच्या सेंडऑफमुळे अबरारला सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी खूप फटकारले आणि ट्रोलही केले. भारताच्या विजयानंतर अबरार अहमद आणि त्याची ही सेलिब्रेशनची पद्धत यावर तो सर्वांच्या रडारवर आला. आता अबरार अहमदने या प्रकरणावर मोठं वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदने गिलच्या विकेटनंतर सेलिब्रेशनबद्दल सांगितले, माझी विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेट करण्याची ही सामान्य पद्धत आहे आणि मी माझ्या घरच्या मैदानावरही असंच सेलिब्रेट करत आलो आहे. त्यामुळे त्यात वेगळं असं काही नव्हतं. या उत्तरादरम्यान अबरारने भारतीय पत्रकाराशी हुज्जत घातल्याचेही दिसले.
This is unwarranted from #AbrarAhmed
— Srikanth Govind (@Srikanth_Govind) February 23, 2025
Now he and his team is going one way only – home – in this CT ?
It was a brilliant delivery, no doubt!#ChampionsTrophy #INDvsPAK #PAKvIND #PakistanCricket pic.twitter.com/6MMyhwkDzr
शुबमन गिलने ५२ चेंडूत सात चौकारांसह ४६ धावा करून अबरारच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने १११ चेंडूत सात चौकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने ४२.३ षटकांत लक्ष्य सहज गाठले आणि सहा विकेट्स राखून सहज विजय मिळवला.