आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांचायात अटीतटीची लढत होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गोलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने चांगली कामगिरी करत पाकिस्तानी फलंदाजांना बांधून ठेवले. ५० धावा होण्याआधीच पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले. फकर झमन तर अवघ्या १० धावा करून तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे भारतीय खेळाडूंनी अपील न करताच झेलबाद म्हणून त्याने मैदान सोडले. त्याच्या या कृतीची सध्या चर्चा होत आहे. (येथे क्लिक करुन पाहा लाईव्ह अपडेट्स)
हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाक सामन्यादरम्यान स्टेडियम भरगच्च! काळा गॉगल लावून विजय देवरकोंडाही झळकला
नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या अवघ्या १५ धावा झालेल्या असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम अवघ्या दहा धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या फकर झमनने आक्रमकपणे खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र तोदेखील अवघ्या दहा धावा करून झेलबाद झाला.
हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 Live Update : पाकिस्तानला दुसरा झटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना फखर झमन झेलबाद
सहावे षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने आवेश खानच्या हातात चेंडू दिला. या विश्वासाला सार्थ ठरवत आवेशने फकर झमनला बाद केलं. विशेष म्हणजे बाद झाल्यानंतर फकर झमनने पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता स्वत:हूनच मैदान सोडले. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फकर झमनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची किनार पकडत यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या हातात विसावला. बॅट आणि चेंडूचा संपर्क आल्याचे दिनेश आणि आवेश या दोघांनाही समजले नाही. मात्र फकर झमनने स्वत:हून मैदान सोडले.