यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू आहेत. या सामन्यांत सर्वच संघ तूल्यबळ असल्यामुळे अटीतटीच्या लढती होत आहेत. दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने पाच गडी राखून भारतावर विजय मिळवला. याच सामन्यात अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. भारताच्या पराभवाला तो जबाबदार आहे, असे मत सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले जात आहे. काही लोक त्याला खलिस्तानी ठरवत आहेत. दरम्यान, एकीकडे अर्शदीप सिंगवर टीका होत असताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने त्याला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजनेही अर्शदीपची पाठराखण केली आहे.
हेही वाचा >> INV vs PAK Virat Kohli : ‘…वाटले आता करिअर संपले’ विराट कोहलीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, म्हणाला “रात्रभर…”
“अर्शदीप सिंगवर टीका करणे थांबवा. कोणीही मुद्दामहून झेल सोडत नाही. आपल्याला आपल्या खेळाडूंविषयी अभिमान आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान चांगला खेळ खेळला. काही लोक सोशल मीडियावर अर्शदीपवर तसेच भारतीय टीमवर टीका करत आहेत. अर्शदीप हा सोनं आहे,” असे हरभजस सिंग म्हणाला. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजनेही अर्शदीपची पाठराखण केली आहे. खेळामध्ये चुका होत असतात. आपण सर्व माणसे आहोत त्यामुळे चुका होणारच. या चुकांमुळे कोणावरही टीका करू नका तसेच त्रास देऊ नका, असे हाफीज सईदने म्हटले आहे.
हेही वाचा >>“हा तर खलिस्तानी, संघातून बाहेर काढा,” भारत-पाक सामन्यात झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंगवर केली जातेय टीका
विराट कोहलीनेदखील अर्शदीप सिंगची पाठराखण केली आहे. भारत-पाकिस्तान सामना खूप दबावामध्ये खेळला गेला. खेळामध्ये चुका होत असतात. या चुकांकडे एक धडा म्हणून पाहिले गेले पाहिजे. याच चुकांमधून शिकायला हवे, असे विराट कोहली म्हणाला.
हेही वाचा >> IND vs Pak : अर्शदीप सिंगवर टीकेची झोड, पण विराट कोहलीने केली पाठराखण, म्हणाला “अशा सामन्यांत…”
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर पाकिस्तानने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली.