आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी भारतीय संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सामन्याला सुरुवात झाली असूनपूर्ण स्टेडियम गच्च भरले आहे. सुपसीद्ध अभिनेता विजय देवरकोंडादेखील हा सामना पाहण्यासाठी आला आहे. काळा गॉगल आणि पांढरा शर्ट परिधान करून तो भारतीय संघाला पांठिबा देताना दिसतोय. (येथे क्लिक करुन पाहा लाईव्ह अपडेट्स)

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 Live Update : भारत-पाकिस्तान सामन्याला सुरूवात; नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

सध्या विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चागली कमाई करताना दिसत नाहीये. मात्र आजचा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी त्यानेदेखील हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे सामना सुरु हाण्यापूर्वी त्याने मैदानात उतरत भारतीय खेळाडूंसाठी चिअरिंगदेखील केली. सध्या स्टेडियममधील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : ‘यावेळी बदला घ्या,’ चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला, टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब जाली. पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज बाबर आझम (१०) स्वस्तात बाद झाला. तिसऱ्या षटकात अर्शदीपने टाकलेल्या चेंडूवर तो झेलबाद झाला.