यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे. सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून भारताने फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली. केएल राहुल-रोहित शर्मा या जोडीने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी केली. मात्र दोघेही ३० पेक्षा जास्त धावा करू शकले नाहीत. रोहितला बाद करण्यासाठी तर पाकिस्तानी खेळाडूंना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 Live : भारताला पाचवा मोठा धक्का, हार्दिक पंड्या शून्यावर बाद

सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर भारताने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. रोहित-राहुल या जोडीने मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. त्यांनी पाकिस्तानविरोधात खेळताना टी-२० सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये भारतासाठी ५० धावा केल्या. मात्र संघाच्या ५४ धावा झाल्यानंतर रोहित शर्मा झेलबाद झाला. २८ धावांवर खेळत असताना त्याने हारिस रऊफच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत गेला. चेंडू उंच गेल्यामुळे पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये झेल टिपण्यासाठी गोंधळ उडाला. शेवटी खुशदिल शाहने रोहितचा झेल टिपला. हा झेल टिपण्यासाठी पाकिस्तानचे दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले. दैव बलवत्तर म्हणून ते यामध्ये जखमी झाले नाहीत.

हेही वाचा >>> “कृपा करून आज विजयी व्हा” ‘मारो मुझे मारो’ फेम मोमीनने पाकिस्तानी संघासमोर जोडले हात; म्हणाला “…तर मी वेडा होईन”

दरम्यान, रोहितसोबत सलामीला आलेल्या केएल राहुलनेही मोठे फटके मारले. त्याने २० चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. तसेच संघ अडचणीत असताना विराट कोहलीने शानदार कामगिरी केली. त्याने अर्धशतकी खेळी केल्यामुळे भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडण सोपे झाले.

Story img Loader