आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. या लढतीत भारताने पाकिस्तानसमोर १८१ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताकडून विराट कोहलीने धमाकेदार फलंदाजी करत ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. तर शेवटचे दोन चेंडू खेळायला आलेल्या रवी बिश्नोईनेदेखील अवघे दोन चेंडू खेळून भारताच्या खात्यात आठ धावा जोडल्या. जे विराटला जमलं नाही ते बिश्नोईने करून दाखवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : धडपडले, गडबडले! कॅप्टन रोहितला बाद करताना पाकिस्तानी खेळाडूंमध्ये उडाला गोंधळ

विराट कोहली मैदावावर शेवटच्या षटकापर्यंत होता. शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा मिळाव्यात म्हणून त्याने भुवनेश्वर कुमाराला स्ट्राईक दिला नाही. तसेच एकही धाव काढली नाही. परंतु चार चेंडूंमध्ये एकही धाव न काढता विराट बाद झाला. नंतर रवी बिश्नोई फलंदाजीला आला व त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर चक्क दोन चौकार लगावले. विराटला शेवटच्या षटकात जे जमलं नाही ते बिश्नोईने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये करून दाखवलं. त्याने सलग दोन चौकार लगावत संघासाठी आठ धावा केल्या.

हेही वाचा >>> IPL 2023 मध्ये चेन्नई संघाचे नेतृत्व कोण करणार? मोठी माहिती आली समोर

दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी आल्यानंतर भारताने आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. रोहित-राहुल या जोडीने मैदानावर अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. त्यांनी पाकिस्तानविरोधात खेळताना टी-२० सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये भारतासाठी ५० धावा केल्या. मात्र संघाच्या ५४ धावा झाल्यानंतर रोहित शर्मा झेलबाद झाला.  रोहितसोबत सलामीला आलेल्या केएल राहुलनेही मोठे फटके मारले. त्याने २० चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. तसेच संघ अडचणीत असताना विराट कोहलीने शानदार कामगिरी केली.