भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या. या सामन्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीला हरवलेली लय गवसल्याचं दिसून आलं. सामन्याच्या सुरुवातीला के. एल. राहुल आणि रोहित शर्माने दमदार सुरुवात केल्यानंतर विराटने डावाला आकार दिला. मात्र मधल्या फळीमधील भारताचे दोन हुकुमी एक्के असणारे ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या स्वस्तात मागे परतले. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून देणाऱ्या पंड्याला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. मात्र चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर एकामागोमाग एक पंत आणि पंड्या ड्रेसिंग रुममध्ये परतल्याने रोहित त्यांच्यावर चांगलाच खवळल्याचं दिसून आलं.
नक्की पाहा >> IND vs PAK Asia Cup: नाद करा पण विराटचा कुठं! खणखणीत षटकार लगावत साजरं केलं अर्धशतकं; Video झाला Viral
Video: पाकविरुद्धच्या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या पंत, पंड्यावर कर्णधार रोहित भडकला; ड्रेसिंग रुममध्ये दोघांना झापलं
पाकिस्तानविरुद्धचा आधीचा सामना जिंकवून देणाऱ्या पंड्याला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-09-2022 at 22:38 IST
TOPICSआशिया चषक २०२४Asia Cup 2023ऋषभ पंतRishabh Pantरोहित शर्माRohit Sharmaहार्दिक पांड्याHardik Pandya
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak asia cup 2022 rohit sharma angry at rishabh pant hardik pandya for poor shot choice video goes viral scsg