यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढततीत भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात ऋषभ पंत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने १२ चेंडूंमद्ये अवघ्या १४ धावा केल्या. ऋषभच्या याच खेळामुळे रोहित शर्मा त्याची शाळा घेताना दिसला. रोहित आणि ऋषभ यांच्यातील संवादाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा उर्वशी रौतेलाचे नाव घेतले आहे.

हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 : दोनच चेंडू खेळला अन् कमाल केली, जे विराटला जमलं नाही ते बिश्नोईने केलं

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर चौथ्या विकेटसाठी ऋषभ पंत मैदानात आला. मात्र त्याने फक्त १४ धावा केल्या. त्यानंतर पवेलियनमध्ये गेल्यानंतर रोहित शर्मा आणि ऋषभ चर्चा करताना दिसले. यावेळी रोहित ऋषभला त्याच्या खेळाबद्दल सांगत होता. त्याने कुठे चूक केली? कोणता फटका मारायला नको होता, याबद्दल तो ऋषभ पंतशी चर्चा करत होता. हा सामना पाहायला अभिनेत्री उर्वशी रौतेलादेखील आली होती. हाच धागा पकडत लोकांनी सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे नाव घ्यायला सुरुवात केली. उर्वशी रौतेलामुळेच ऋषभ पंत चांगला खेळ करू शकलेला नाही, असे मत काही नेटकऱ्यांनी मांडले.

हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 : धडपडले, गडबडले! कॅप्टन रोहितला बाद करताना पाकिस्तानी खेळाडूंमध्ये उडाला गोंधळ

दरम्यान, भारताकडून विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा करत भारताला १८१ धांवापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं रोहित शर्मा, केएल राहुलने २८ धावा केल्या. तर दीपक हुडाने १६ धावा केल्या. मात्र पाकिस्तानने हा सामना पाच गडी राखून जिंकला. भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Story img Loader