आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. या लढतीत पाकिस्तानने १४६ धावा केल्या असून भारताने गोलंदाजी विभागात चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजीसाठी आल्यानंतर मात्र भारताची सुरुवात आतिशय खराब झाली. भारताचा सलामीवीर केएल राहुल गोल्डन डकवर तंबुत परतला. विशेष म्हणजे पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या जागेवर ज्या गोलंदाजाचा संघात समावेश केला होता, त्याच खेळाडूने राहुलला शून्यावर बाद केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानी फलंदाज फकर झमनच्या इमानदारीची चर्चा, पंचाने बाद देण्याआधीच सोडले मैदान

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेच्या बाहेर आहे. त्याच्या जागेवर नसीम शाह याला संधी देण्यात आलेली आहे. याच संधीचं नसीमने सोनं केलं. त्याने भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल याला दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद केलं. केएल राहुल सलामीच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच षटकात नसीम शाहने त्याचा त्रिफळा उडवला. केएल राहुल शून्यावर बाद झाल्यामुळे भारताचा संघ अडचणीत सापडला.

हेही वाचा >> IND vs PAK T20 Asia Cup: …म्हणून ऋषभ पंत भारत-पाक सामन्यातून बाहेर; मैदानातील ‘या’ अभिनेत्रीला ठरवलं जातंय दोषी

दरम्यान, पाकिस्तानचा संघ फलंदाजी विभाग चांगली कामगिरी करू शकला नाही. सलामीला आल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवानने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak asia cup 2022 update kl rahul out on golden duck by naseem shah prd