IND vs PAK (Asia cup 2023) Babar Azam record vs India: २ सप्टेंबर (शनिवार) रोजी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. दोन्ही संघ १० महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये आमनेसामने असतील. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात दोघांमध्ये लढत झाली होती. मात्र, यावेळी रोहित शर्मा आणि बाबर आझमचा संघ वन डे फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा बाबर आझमकडे लागल्या आहेत. सध्याच्या आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने नेपाळविरुद्ध १५१ धावांची खेळी करून इतर संघांना इशारा दिला आहे. बाबर भलेही चांगल्या फॉर्ममध्ये असेल, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध त्याचा रेकॉर्ड खराब आहे.

भारत आणि पाकिस्तानचे संघ चार वर्षांनंतर एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे २०१९च्या विश्वचषकात दोघांमध्ये शेवटचा सामना झाला होता. त्या सामन्यात बाबर आझमही खेळला होता. कुलदीप यादवच्या शानदार चेंडूवर तो ४८ धावांवर बाद झाला. बाबरने भारताविरुद्ध आतापर्यंत पाच वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या खात्यात एकही शतक किंवा अर्धशतक नाही.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Icc test rankings updates in marathi
Test Rankings : ICC ची ताजी कसोटी क्रमवारी जाहीर! यशस्वी जैस्वालला फायदा तर बाबर आझमला बसला मोठा फटका
ICC Announces Womens T20 World Cup 2024 Schedule India vs Pakistan Match on October 6
Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
WTC Points Table ENG vs SL England big stride After 1st test of ENG vs SL Win by 5 Wickets
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?

बाबरची भारताविरुद्धची सरासरी ४० पेक्षा कमी आहे

बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १०४ सामने खेळले आहेत. या कालावधीत ५९.४७ च्या सरासरीने ५३५३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १९शतके आहेत. वन डेमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये तो नेहमीच संघर्ष करत आला आहे. बाबरने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या पाच डावात केवळ १५८ धावा केल्या आहेत. त्याची सरासरीही ४० पेक्षा कमी आहे. पाकिस्तानी कर्णधाराने ३१.६०च्या सरासरीने आणि ७५.९६च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Diamond League: आता लक्ष्य एकच ९० मीटर भालाफेकीचे; विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी ‘पोस्टर बॉय’ नीरज चोप्रा सज्ज

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात बाबरची कामगिरी

वर्षटूर्नामेंटस्पर्धेचे ठिकाणधावा
२०१७चॅम्पियन्स ट्रॉफीबर्मिंगहॅम
२०१७चॅम्पियन्स ट्रॉफीओव्हल४६
२०१८आशिया कपदुबई४७
२०१८आशिया कपदुबई
२०१९एकदिवसीय विश्वचषकमँचेस्टर४८

कुलदीपसमोर बाबर आझमची खराब आकडेवारी

बाबरला भारताविरुद्ध खेळताना त्याला उमेश यादव, केदार जाधव आणि कुलदीप यादव (दोनदा) यांनी बाद केले आहेत. तसेच, एकदा धावबाद झाला आहे. अशा स्थितीत त्याचा विक्रम पाहता त्याला भारतीय फिरकीपटू आणि विशेषत: कुलदीप यादव याच्यासमोर खूप खेळायला त्रास होतो. यावेळीही कुलदीप संघात आहे आणि याआधी त्याने त्याला दोनदा बाद केले आहे. कुलदीपला पुन्हा एकदा पाकिस्तानी कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची संधी आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारत-पाकिस्तान गोलंदाजीत कोण आहे सरस? रवींद्र जडेजा म्हणाला, “आशिया चषकापूर्वी टीम इंडिया…”

आशिया कपसाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन.

पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरीस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ , हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.