Asia Cup 2023: आशिया चषक होस्टिंगच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गतिरोध संपवण्यासाठी उपाय न मिळाल्यास एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि ब्रॉडकास्टर यांच्यातील दीर्घकाळ चाललेला मीडिया हक्क करार धोक्यात येऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते, परंतु शेजारील देशांमधील सध्याच्या राजकीय तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सप्टेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी भारत संघ पाठवणार नसल्याचे सांगितले. भारताने ही महाद्वीपीय स्पर्धा यूएई किंवा श्रीलंकेत आयोजित करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे.
एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि ब्रॉडकास्टर यांच्यात दीर्घकालीन मीडिया हक्क करार धोक्यात येऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते, परंतु शेजारील देशांमधील सध्याच्या राजकीय तणावामुळे, बीसीसीआयने सांगितले की भारत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवणार नाही. त्यामुळे त्याची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भारताने ही महाद्वीपीय स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई किंवा श्रीलंकेत आयोजित करावी असा प्रस्ताव एशियन क्रिकेट कौन्सिलला दिला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही मागणी अद्याप मान्य केली नाही, त्यामुळे हा गोंधळ उडाला आहे. आशिया चषक स्पर्धेतून भारताच्या माघारामुळे स्पर्धेतील मजाच हिरावून घेतली जाईल आणि भारत-पाक लढतीच्या अनुपस्थितीमुळे ब्रॉडकास्टरला मोठे नुकसान सहन करावे लागेल अशी चिन्ह आहेत त्यामुळे सर्वजण चिंताग्रस्त झाले आहेत.
सूत्राने सांगितले की. “एशियन क्रिकेट कौन्सिल आणि ब्रॉडकास्टर यांच्यातील दीर्घकालीन करारानुसार, प्रादेशिक संघांच्या या स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत किमान दोन किंवा तीन वेळा एकमेकांना खेळतील त्यामुळे आम्हाला यातून खूप मोठी कमाई होणार पण सामनेच झाले नाहीत तर मग ही सर्व नुकसान भरपाई तुम्ही आम्हाला द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.” सूत्राने पुढे असेही सांगितले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांशिवाय आशिया चषक होणे शक्य नाही. यावर तोडगा नक्की निघेल.”
संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०२२ आशिया चषकादरम्यान घडले त्याप्रमाणे अंतिम सामन्यापूर्वी कट्टर प्रतिस्पर्धी किमान दोनदा एकमेकांना सामोरे जातील याची प्रसारकांना हमी देण्यात आली होती. ते म्हणाले, “पाकिस्तान आणि भारताच्या सामन्यांशिवाय आशिया चषक होऊच शकत नाही हे पीसीबीला देखील माहिती आहे, ब्रॉडकास्टर करार रद्द होईल असे लगेच समजण्याचे कारण नाही.”