India vs Pakistan Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. मात्र या स्पर्धेचा रोमांच आज (रविवार) शिगेला पोहचणार आहे. कारण आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. या हाय व्होल्टेड सामन्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानसाठी या स्पर्धेची सुरूवात चांगली झालेली नाही. यजमान पाकिस्तान संघाला न्यूझीलंडविरोधात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर भारताने आधीच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले आहे. मात्र स्पर्धेत टिकून राहण्याचा दबाव असलेल्या पाकिस्तानी संघाला भारतातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. या माजी भारतीय क्रिकेटर अतुल वासन यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल आपले मत मांडताना आजच्या सामन्यात पाकिस्तान जिंकावा असं मत व्यक्त केले आहे. असं वाटण्यामागे नेमकं कारण काय आहे हे देखील त्यांनी सांगितले आहे.

आठ वर्षांपूर्वी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. यंदा मात्र पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावरच्या मोठा धक्का बसला आहे. पाक संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे दुबईमध्ये भारताने बांगलादेशवर मात करून चार संघांच्या गटात आघाडी घेतली आहे. या चारपैकी दोन संघ हे सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

नेमकं म्हणणं काय आहे?

पण जर आज (रविवारी) भारताने पाकिस्तानला हरवले तर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. पाकिस्तानने भारताविरोधात सामना जिंकला तर स्पर्धेत अधिक रोमांच येईल असे अतुल वासन यांचे म्हणणे आहे. “मला वाटतं की पाकिस्तानने सामना जिंकावा . मजा येईल (स्पर्धेत यामुळे रोमांच येईल). जर तुम्ही पाकिस्तानला जिंकू दिलं नाही, तर तुम्ही काय कराल? जर पाकिस्तान जिंकला तर स्पर्धे चुरस वाढेल. लढत तुल्यबल असली पाहिजे,” एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना वासन असे म्हणाले. वासन यांनी भारताकडून नऊ एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानसाठी हा सामना करा किंवा मरा असा आहे. जर ते भारताकडून पराभूत झाले तर सेमीफायनलच्या शर्यतीतून पाकिस्तानचा संघ बाहेर पडेल. परंतु जर ते जिंकले तर चाहत्यांना पुन्हा एकदा या दोन्ही संघांमधील सामना पाहायला मिळेल. जे क्रिकेटसाठी चांगले असेल. म्हणूनच २३ फेब्रुवारी रोजी होणारा सामना पाकिस्तानने जिंकावा अशी माझी इच्छा आहे, असे वासन म्हणाले आहेत.

इतिहास काय सांगतो?

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या २०२१ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला हरवले असले तरी, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर त्यांना सहा सामन्यांपैकी एकही वनडे सामना जिंकता आलेला नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीली टीम इंडियाने २०२३ च्या अहमदाबाद येथे झालेल्या वनडे वर्ल्डकप सामन्यात पाकिस्तानला त्यांच्या लीग-स्टेज सामन्यात हरवले होते , त्यानंतर लगेचच त्याच वर्षी आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानला दोनदा हरवले आहे.

संघ

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा , बाबर आझम, इमाम उल हक, कामरान गुलाम, सौद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

वेळ : दुपारी २.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.