India vs Pakistan Match Updates, Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वात मोठी लढत भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना आज दुबई येथे खेळवला जात आहे. या दोन संघाच्या लढतीकडे कोट्यवधी क्रिेकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. यादरम्यान पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे गव्हर्नर आणि पाकिस्तानातील राजकीय नेत्याने एक मोठी घोषणा केली आहे. कामरान टेस्सोरी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या या हाय व्होल्टेज सामन्यात भारताला हरवल्यास पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाला १ कोटी पाकिस्तानी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. एआरवाय न्यूज या चॅनेलशी बोलताना टेस्सोरी यांनी हे आश्वासन दिले.
यजमान पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड विरोधात ६० धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. नॅशनल स्टेडियम कराची येथे झालेल्या या पराभवानंतर मोहमद रिझवान याच्या नेतृत्वाखीलल पाकिस्तानी संघ भारताविरोधात स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाने मात्र स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशला हरवल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे.
पाकिस्तानी संघासाठी जाहीर केलेलं हे बक्षीस त्यांना मिळणार की नाही, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान याबद्दल एआरवाय या न्यूज चॅनलला बोलताना टेस्सोरी म्हणाले की, “पाकिस्तान संघ जिंकला तर मी माझ्या खिशातून एक कोटी रुपये संघासाठी आता जाहीर करत आहे. असं नाही की हारले तर आम्ही खेळाडूंचे आणि संघाचे कौतुक करणार नाहीत. असंही ते आपला गौरव आहेत. पण सर्वजण प्रार्थना करत आहेत. आशा आहे की देव विजयासाठी आपली मदत करेल.”
संघ
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा , बाबर आझम, इमाम उल हक, कामरान गुलाम, सौद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
●वेळ : दुपारी २.३० वा.
●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.