Sunil Gavaskar on Asia Cup 2023: आशिया चषकाच्या सुपर-४ टप्प्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारताच्या पहिल्या चार फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. या सामन्यात विराट कोहली आणि के.एल. राहुलनेही शतके झळकावली. त्याआधी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी अप्रतिम अर्धशतके झळकावली, जे पाहून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद झाला. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गावसकर म्हणतात की, “भारताने पाकिस्तानची पूर्णपणे धुलाई केली.”

इंडिया टुडेशी बोलताना गावसकर म्हणाले, “सर्वात मोठ्या विजयाबद्दल बोला, मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता पावसात जसे धोबी घाटावर धोबी कपडे धुतात तसे भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. जर तुम्ही परिपूर्ण संघ असाल तर शेवटच्या सामन्याच्या निकालाचा तुमच्यावर परिणाम होऊ देत नाही. जर त्याचा जास्त विचार केला तर तुम्ही पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. पाकिस्तानकडून अशी चूक होण्याची मला अपेक्षा नाही.”

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

हेही वाचा: Asia Cup 2023: पाकिस्तान संघाला मोठा धक्का! नसीम शाहसह ‘हा’ गोलंदाज दुखापतीमुळे आशिया कप मधून होऊ शकतो बाहेर

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा फलंदाजी केली आणि त्याने कारकिर्दीतील ७७वे शतक पूर्ण केले. त्याचवेळी दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या के.एल. राहुलने पहिल्या सामन्यातच शतक झळकावले. गावसकर यांनी के.एल. राहुलचे खूप कौतुक केले आहे. ते म्हणाले, “के.एल. राहुलने केवळ शतकच केले नाही तर विकेट्सही राखल्या. त्याच्या फिटनेसबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्याने ही दिलेली ही प्रतिक्रिया आहे. त्याने सिद्ध केले की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.”

लिटल मास्टर गावसकर यांनीही भारतीय गोलंदाजीचे कौतुक केले. ते म्हणाले, “जसप्रीत बुमराहही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याची रन अप चांगली दिसत होती आणि त्याने चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग केला. बाबर आझमसारखे जागतिक दर्जाचे फलंदाजही त्याला खेळू शकले नाहीत. यातून तो नुसता फिट नाही तर फॉर्ममध्ये देखील आहे.”

हेही वाचा: IND vs SL: एका मिनिटासाठी भारतीय चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला, जसप्रीत बुमराहबाबत असं काही घडलं की; पाहा Video

उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, आशिया चषकाच्या सुपर-४ टप्प्यातील या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा २२८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीने १२२ आणि के.एल. राहुलने १११ धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही पाच विकेट्स घेतल्या. मंगळवारी (१२ सप्टेंबर) सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळत असून श्रीलंकेसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले आहे. सुपर-४ मध्ये भारताचे खाते उघडले आहे. त्याच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेचेही प्रत्येकी दोन गुण आहेत.