२३ फेब्रुवारीला रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानविरूद्ध संघाला एकहाती विजय मिळवून देणाऱ्या विराट कोहलीची बॅट सध्या शांत आहे. पण विराट कोहली पाकिस्तानविरूद्ध शतक करू शकतो अशी भविष्यवाणी त्याने केली आहे.

विराट कोहली सध्याच्या घडीला त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये नाहीय. गेल्या ६ सामन्यांमध्ये त्याने फक्त एक अर्धशतक केले आहे, तर धावा काढण्यासाठी तो खूप प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात विराट फिरकीपटूविरूद्ध बाद झाला होता.

हरभजन सिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणार असल्याची धाडसी भविष्यवाणी केली आहे आणि माजी फिरकीपटूने असे म्हटले आहे की जर त्याने हा पराक्रम केला तर तो भांगडा नृत्य करेल. पाकिस्तानविरूद्ध सामन्यापूर्वी विराट कोहली आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी दीड तास लवकर सराव सत्रासाठी पोहोचला होता आणि संघाच्या सरावाचे नेतृत्त्व करतानाही दिसला.

इंडिया टुडेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली त्याचे ५१ वे वनडे शतक ठोकेल असे मला वाटते. संपूर्ण देश कोहलीच्या मागे असल्याचेही फिरकीपटू म्हणाला.

“मी एक मोठी भविष्यवाणी करणार आहे. विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध शतक केले तर? होय, त्याचे गेले ४ महिने कसेही गेले असले तरी, उद्या जर त्याने शतक झळकावले तर लोक नक्कीच लक्षात ठेवतील. तर चल, चिकू (विराटला भारतीय संघात प्रेमाने चिकू म्हणतात) संपूर्ण देश तुझ्याबरोबर आहे. मला आशा आहे की तू शतक करशील आणि तसं झालं तर मी सामन्यानंतर भांगडा करेन”, असं हरभजन सिंग म्हणाला.

हरभजन म्हणाला की कोहलीला त्याची भूमिका चांगली समजते. हरभजन पुढे म्हणाला, “विराटला त्याची भूमिका समजली आहे. लोक विराट कोहलीची फलंदाजी आणि धावा पाहण्यासाठी उत्सुक आहेत, आणि संघाला त्याची इतर कोणापेक्षाही जास्त गरज आहे आणि अर्थातच जेव्हा अटीतटीचा सामना होता विराट कोहली नेहमीच आपल्या फॉर्मात परत येतो. त्याच्यासाठी फॉर्ममध्ये येण्याची हीच योग्य वेळ आहे. विराटला नेटमध्ये येऊन इतरांपेक्षा कसोशीने सराव करताना पाहून चांगलं वाटलं.”

Story img Loader