Hardik Pandya watch in India vs Pakistan match in Dubai : आयसीसी चॅम्पयन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळाला. सामन्याच्या सुरूवातीलाच पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानचा सलामी फलंदाज बाबार आझम याला बाद केले.

घड्याळाची किंमत इतके कोटी

बाबरला बाद केल्यानंतर हार्दिक पांड्याने केलेलं सेलीब्रेशन चर्चेचा विषय देखील ठरलं. मात्र त्याहून जास्त चर्चा झाली ती हार्दिक पांड्या याने घातलेल्या घड्याळाची. पांड्याने या सामन्यादरम्यान अतिशय महागडे ‘रिचर्ड मिल आरएम २७-०२’ (Richard Mille RM 27-02) घड्याळ घातले होते. जेम नेशन या ऑनलाइन लक्झरी घड्याळांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार या घड्याळाची किंमत तब्बल ८००,००० डॉलर्स म्हणजेच ६.९३ कोटी रुपये इतकी आहे.

बाबर आझमला बाद केल्यानंतर पांड्याच्या मनगटावरील या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांमध्ये लगेचच त्याच्या रिचर्ड मिल आरएम २७-०२ सीए एफक्यू टूरबिलन राफेल नदाल स्केलेटन डायल या अत्यंत दुर्मिळ घड्याची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. हे घड्याळ इतके दुर्मिळ आहे की अशी फक्त ५० घड्याळेच तयार करण्यात आली आहेत.

हे घड्याळ त्याच्या अत्यंत प्रगत इंजिनिअरींगसाठी ओळखले जाते. या घड्याळात कार्बन टीपीटी युनिबॉडी बेसप्लेट देण्यात आली आहे, ज्याची प्रेरणा ही रेसिंग कार चेसिसपासून घेण्यात आली आहे. क्रिकेटबरोबरच हार्दिक पांड्या हा त्याच्याकडे असणाऱ्या महागड्या घड्याळांच्या संग्रहासाठी ओळखला जातो.

Richard Mille RM 27-02 CA FQ Tourbillon Rafael Nadal Skeleton Dial

रिचर्ड मिल आरएम २७-०२ एवढं का महाग आहे?

आरएम २७-०२ हे खासकरून ग्रेड ५ टायटॅनियम ब्रिज, स्केलेटनाइज्ड मुव्हमेंट आणि ७० तासांच्या पावर रिझर्व्हसह येते. घड्याळात देण्यात आलेल्या क्वार्ट्झ टीपीटीमुळे याला आकर्षक ब्लॅक अँड व्हाईट लूक मिळतो. आरएम २७-०२ हे रिचर्ड मिलच्या सर्वात प्रगत डिझाइनपैकी एक आहे, हे मुळात दिग्गज टेनिस खेळाडू राफेल नदालसाठी तयार करण्यात आले होते . अँटी-ग्लेअर सफायर क्रिस्टल, कार्बन आणि क्वार्ट्ज फायबर याची बांधणी केलेली आहे. तसेच यामध्ये अत्यंत तीव्र धक्के सहन करण्याची क्षमता यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे हे जगातील सर्वात टिकाऊ हाय एंड घड्याळ ठरते.

Story img Loader