IND vs PAK Hockey Match Updates: भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकिस्तानचा २-१ च्या फरकाने पराभव केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरमध्ये दणदणीत दोन गोल करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानवरील या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली.

भारतीय हॉकी संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा २-१ असा पराभव करत स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली आहे. भारताचे दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. तर पाकिस्तानकडून एकमेव गोल अहमद नदीमने केला. या विजयासह भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. तर पाकिस्तान संघाचा हा पहिलाच पराभव आहे. गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यापूर्वीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

Tilak Verma Century at Duleep Trophy Suryakumar Yadav Shares Instagram Story said Best Birthday Gift
Tilak Verma Century: तिलक वर्माच्या शतकाचं आवेश खानने केलं सॅमी स्टाईल सेलिब्रेशन, सूर्यकुमार यादव पोस्ट करत म्हणाला “बेस्ट बर्थडे गिफ्ट…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण

हेही वाचा – Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटूच्या अभिनेत्री सासूबाईंचा विराबरोबर सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

भारत पाकिस्तान सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने आठव्या मिनिटाला केला. नदीम अहमदने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, मात्र यानंतर भारताने एकही संधी दिली नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंगने काही वेळातच पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. पहिल्या क्वार्टरनंतर स्कोअर १-१ असा बरोबरीत असला तरी दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने गोल केला. शेवटपर्यंत हा स्कोअर कायम ठेवत भारताने सामना जिंकला. इतकेच नव्हे तर भारताचा नवा गोलकिपर क्रिशन पाठकने शानदार कामगिरी करत दोन गोल वाचवले आणि भारताला सामन्यात कायम ठेवले.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

हेही वाचा – Piyush Chawla : ‘तुझ्या मुलाबरोबरही खेळेन…’, पीयुष चावलाने आपल्या निवृत्तीबद्दल सांगताना पृथ्वी शॉची दिलं प्रत्युत्तर

भारताने पाकिस्तानचा पराभव करत स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला आहे. या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चीनचा ३-१, जपानचा ५-१ आणि मलेशियाचा ८-१ असा पराभव केला होता. तर, संघाने दक्षिण कोरियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली आहे.

पाकिस्तान संघानेही या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली होती. या संघाने आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले असून त्यात २ सामने जिंकले आहेत. तर संघाने २ सामने अनिर्णित राहिले होते. पाकिस्तानने मलेशिया आणि दक्षिण कोरियाविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली, तर संघाने जपानचा २-१ आणि चीनचा ५-१ अशा फरकाने पराभव केला.