IND vs PAK, Hockey Team: एकीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा श्रीलंकेच्या कॅंडीमध्ये सुरु असलेल्याथे भारत आणि पाकिस्तान सामन्यावर होत्या, जिथे हे दोन संघ एकदिवसीय आशिया कपमध्ये आमनेसामने होते. त्यात पाऊस लपाछपीचा खेळ खेळत होता. शेवटी पावसाने हा रद्द झाला. दरम्यान, दुसरीकडे, हॉकी ५s पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू होता. मात्र, हा स्पर्धेचा अंतिम सामना होता आणि यामध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. टीम इंडियाने पेनल्टी शूट आउटद्वारे ६-४ असा शानदार विजय संपादन केला.

हॉकी ५s फॉरमॅटमध्ये ५ खेळाडू मैदान उतरतात. अंतिम फेरीत भारताकडून मनदीप मोर (कर्णधार), सूरज करकेरा, जुगराज सिंग, मनिंदर सिंग आणि पवन राजभर यांनी मैदानात उतरले. हा सामना खूपच रोमांचक होता ज्यात एकवेळ अशी होती ज्यावेळी पाकिस्तानचे ३ गोल होते तर भारताचे २ गोल होते. भारत एका गोलने पिछाडीवर होता, मात्र अखेरच्या क्षणांमध्ये भारताने १ गोल करत गुणसंख्या ४-४ अशी बरोबरी केली.

Afghanistan A Win Emerging Asia Cup trophy For The First Time After Beating Sri Lanka A in Final Watch Video of Celebration
Emerging Asia Cup: नवा आशिया चॅम्पियन! अफगाणिस्तानने भारतानंतर श्रीलंकेला दणका देत घडवला इतिहास, विजयाचं केलं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Virat Kohli Babar Azam
‘क्रिकेट डिप्लोमसी’ सांधणार भारत-पाकिस्तान संबंध?
BCCI in Action Mode After India Streak Ending Defeat in Pune said No Optional Training Ahead of IND vs NZ Mumbai Test
IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
Rohit Sharma Statement on India Defeat Against New Zealand in Test Series Said We just didnt bat well enough IND vs NZ Pune
IND vs NZ: “…तर आता परिस्थिती वेगळी असती”, रोहित शर्माचे भारताने मालिका गमावल्यानंतर मोठे वक्तव्य, कोणावर फोडले पराभवाचे खापर?
IND vs NZ India lost a Test series at home after 12 years
IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका
PAK vs ENGPAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years
PAK vs ENG : पाकिस्तानने ३ वर्षांनी मायदेशात जिंकली कसोटी मालिका, साजिद-नोमानच्या जोरावर इंग्लंडचा उडवला धुव्वा
IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William O Rourke in Pune test
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरच्या अचूक थ्रोवर रवींद्र जडेजाने हुशारीने विल्यम ओ रुकला केले रनआऊट, VIDEO व्हायरल

हेही वाचा: IND vs PAK: शाहीन आफ्रिदीचा गोल्डन इनस्विंग अन् रोहित शर्माच्या विकेटवर विराट कोहलीची रिअ‍ॅक्शन व्हायरल; पाहा Video

यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय घ्यायचा होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने दोन्ही शॉट्सचे गोलमध्ये रूपांतर केले, तर पाकिस्तानने एका शॉटचे गोलमध्ये रूपांतर केले पण दुसरा शॉट चुकला. यासह भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला आणि ६-४ने स्पर्धाही जिंकली. आता भारतीय हॉकी संघ ५s हॉकी विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे भारताने ३५ गोल करत जपानी संघाचा पराभव केला.

सेमी फायनलमध्ये भारताने मलेशियाला हरवले

भारताने शनिवारी येथे उपांत्य फेरीत मलेशियाचा १०-४ असा पराभव करून उद्घाटनाच्या पुरुष हॉकी ५s आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने पहिल्या उपांत्य फेरीत ओमानचा ७-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. स्पर्धेतील एलिट पूल स्टेज सामन्यात भारताला पाकिस्तानकडून ४-५ असा पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक, पाकिस्तान रौप्य पदक आणि मलेशिया कांस्यपदक मिळाले.

हेही वाचा: IND vs PAK: पल्लेकेलेमध्ये इशान-हार्दिकचा ‘पॉवरफुल’ शो, पाचव्या विकेटसाठी पाकिस्तानविरुद्ध सर्वात मोठी पार्टनरशिप

या खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली

भारताकडून उपांत्य फेरीत मोहम्मद राहिल (९वे, १६वे, २४वे, २८वे मिनिट), मनिंदर सिंग (दुसरे मिनिट), पवन राजभर (१३वे मिनिट), सुखविंदर (२१वे मिनिट), दीपसन तिर्की (२२वे मिनिट), जुगराज सिंग. (२३वे मिनिट) आणि गुरजोत सिंग (२९व्या मिनिटाला) यांनी गोल केले. मलेशियाकडून कर्णधार इस्माईल आसिया अबू (4वे मिनिट), अकाहिमुल्लाह अन्वर (७वे, १९वे मिनिट), मोहम्मद दिन (१९वे मिनिट) यांनी गोल केले. या विजयाने २०२४च्या FIH हॉकी फाइव्ह विश्वचषकात भारताचे स्थान निश्चित केले.