ICC ODI WC 2023: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) शंका काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला पाकिस्तान सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले नाही. त्यामुळे विश्वचषकासाठी भारतात जाण्याबाबत त्याची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.” यावर आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबीने या करारावर स्वाक्षरी केली असून ते त्याला भारतात खेळण्यास बांधील आहेत असे आम्ही अपेक्षित धरतो.”
पाकिस्तानमधील परिस्थितीवर ICC काय म्हणाले?
आयसीसीने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानमधील परिस्थितीबाबत ते म्हणाले, “पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. आम्हाला आशा आहे की, ते हा करार मोडणार नाहीत आणि भारतात येतील. विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ आपापल्या देशाच्या नियमांना बांधील आहेत आणि आम्ही त्याचाही आदर करतो. मात्र, विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान नक्कीच भारतात येईल, असा आम्हाला विश्वास आहे.” आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बार्कले आहेत. ते पुढे म्हणाले की, “तुम्ही जर असे केले तर त्या कराराचे उल्लंघन असेल. यावर योग्य ती पावले उचलली जातील.”
पीसीबीची मागणी आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळून लावली होती
अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची पीसीबीची मागणी आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळून लावली. याबरोबरच, पाकिस्तानला अहमदाबादमध्ये भारतासोबत सामना खेळवायचा नव्हता, असेही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले होते. मसुदा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, पीसीबीने आयसीसी आणि बीसीसीआयला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना बंगळुरूला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना चेन्नईला हलवण्याची विनंती केली होती. मात्र, वेळापत्रक आल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना चेन्नईत आणि पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना बंगळुरूमध्ये होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, पाकिस्तानला भारताविरुद्ध १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्येच सामना खेळावा लागणार आहे.
वर्ल्डकपमधील सहभागाबाबत पाकिस्तानने काय म्हटले?
वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, पीसीबीच्या अधिकृत सूत्राने सांगितले की, “वेळापत्रक मंजुरीसाठी सरकारकडे पाठवले जाईल. “विश्वचषकातील आमचा सहभाग, १५ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध होणारा सामना किंवा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास मुंबईत खेळणे, हे सर्व सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल. आतापर्यंत सरकारने पीसीबीला खेळण्याची परवानगी दिली आहे.”
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीसीबी निर्णय घेऊ शकते
पीसीबी पुढे म्हणाले. “प्रवासासाठी कोणतीही एनओसी जारी करण्यात आलेली नाही आणि हा एक संवेदनशील मुद्दा असल्याने बोर्ड सरकारकडून स्पष्ट सूचना मिळाल्यानंतरच पुढे जाऊ शकते. आम्ही आयसीसीला आधीच कळवले आहे की स्पर्धेत किंवा स्थळांवर आमचा सहभाग कोणतीही समस्या प्रथम पीसीबीला भारतात जाण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळण्याशी संबंधित असते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीसीबी निर्णय घेऊ शकते”