Shoaib Akhtar on IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज, २ सप्टेंबर रोजी काही तासांत सुरू होईल. पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली आहे. अशा स्थितीत त्याचा संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. टीम इंडियालाही पाकिस्तानवर आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणतो की, “जो संघ प्रथम फलंदाजी करेल तो सामना सहज जिंकेल.” त्यामुळे आजच्या नाणेफेक या सामन्यात खूप महत्वाची ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिया चषक २०२३ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आज म्हणजेच २ सप्टेंबर रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याबाबत क्रिकेटपंडित आपापले अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठे विधान केले असून नाणेफेक जिंकणारा संघ या सामन्यात वर्चस्व गाजवेल असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यात दबावाने भरलेला असतो. अशा स्थितीत बहुतेक वेळा कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणे पसंत करतो. याशिवाय रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गोलंदाजाने खेळपट्टीबाबतही मोठी माहिती सांगितली आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणतो की, “श्रीलंकेची खेळपट्टी अद्याप स्थिर झालेली नाही आणि रात्रीच्या प्रकाशात चेंडू बॅटवर चांगला येत नाही.” भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी या मैदानावर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना झाला होता. हा लोस्कोरिंग सामना होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ १६४ धावांवर सर्वबाद झाला, या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी यजमान संघाला ३९ षटके लागली.

हेही वाचा: IND vs PAK, Asia Cup: भारत-पाकिस्तान आशिया कप महामुकाबल्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास काय असेल समीकरण? जाणून घ्या

शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “जर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली तर ते खरोखरच ते भारताला हरवतील. मात्र, भारताने नाणेफेक जिंकल्यास, विकेट अद्याप सावरलेली नसल्यामुळे आणि डे-नाईट सामन्यात रात्री चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नसल्याने पाकिस्तान अडचणीत येऊ शकतो.” याशिवाय शोएब अख्तरने भारताला तीन वेगवान गोलंदाजांसह प्लेइंग इलेव्हनमध्ये पूर्णवेळ फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, “या चायनामन गोलंदाजाला बाहेर बसवून भारताने आधीच बराच वेळ वाया घालवला आहे.

शोएब अख्तर म्हणाला, “माझ्या मते भारताने तीन वेगवान गोलंदाजांसोबत सामन्यात उतरावे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खूप चांगले आहेत. कुलदीप यादवला सोडता कामा नये. आधीच त्याला बाहेर ठेवून पुरेसा वेळ वाया घालवला आहे. तो एक प्रतिभावान रिस्ट स्पिनर असून खूप हुशारीने गोलंदाजी देखील करतो आहे.”

हेही वाचा: IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोहम्मद शमीचे मोठे विधान; म्हणाला, “मला नवीन किंवा जुन्या चेंडूने…”

आशिया कपसाठी दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन.

पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरीस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ , हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak if pakistan bats first india will lose shoaib akhtar predicted before the match avw