IND vs PAK IIT Baba Prediction on Champions Trophy India Pakistan Match: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २३ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या क्रिकेटमधील हायव्होल्टेज लढत भारत-पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीसाठी जगभरातील क्रिकेट चाहते आयसीसी टूर्नामेंटची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्याची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. भारत-पाक सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ फेव्हरेट असल्याचे मानले जात आहे. पण भारतातील आयआयटी बाबा अभय सिंह यांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे भारतीय चाहते चिंतेत पडले आहेत.

भारत- पाकिस्तान सामन्यासाठी चाहते उत्सुक असतानाच महाकुंभ मेळ्यातून प्रसिद्धीझोतात आलेला आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंहने या सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याच्या या अंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आयआयटीयन बाबा अभय सिंह म्हणाले की, यावेळी आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी होईल. आयआयटी बाबाने तर असा दावा केला की विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी कितीही प्रयत्न केले तरी भारत जिंकू शकणार नाही! त्यांच्या या व्हिडिओवर क्रिकेट चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.

व्हीडिओमध्ये आयआयटी बाबा म्हणाले, “मी तुम्हाला आधीच सांगतो, यावेळेस भारतीय संघ जिंकणार नाही. मी जर एकदा बोललो नाही जिंकणार तर नाहीच जिंकणार, आता तुम्ही मोठे आहात की देव मोठा आहे? पाहूया…” आयआयटी बाबाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे,अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना नॅशनल स्टेडियम, कराची येथे खेळवला गेला, या सामन्यात पाकिस्तान संघाला किवी संघाकडून ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानला जर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर त्यांना भारताविरूद्धचा सामना जिंकावा लागणार आहे, पण पाकिस्तानसाठी हा सामना सोपा असणार नाही. यादरम्यानच आता आयआयटी बाबाने केलेल्या भविष्यवाणीवर पाकिस्तान संघ खरा उतरतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader