India vs Pakistan Rivalry Is Bigger Than Ashes: आशिया चषक २०२३आधी पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट सामन्यासाठी उत्साह निर्माण होत असताना, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मूडी याने दोन्ही संघांची तयारी आणि त्यांना सामोरे जाणाऱ्या संभाव्य आव्हानांवर आपले मत मांडले. त्यांच्या मते, “भारत-पाकिस्तान सामना अॅशेसपेक्षा मोठा आहे.”
आशिया चषक २०२३चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, सर्व चाहते २ सप्टेंबरच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी, २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, भारत आणि पाकिस्तानचे संघ प्रथमच ५० षटकांच्या फॉर्मेटमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडी यांनी या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले असून याला अॅशेसपेक्षाही मोठी स्पर्धा असल्याचे म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान सामना अॅशेसपेक्षा मोठा आहे- टॉम मूडी
टॉम मूडी, स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, “भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याचे महत्त्व प्रतिबिंबित करताना मला त्याची तुलना प्रतिष्ठित अॅशेस मालिकेशी करावीशी वाटते. दोन्ही संघांची ताकद आणि विचारांची चर्चा केली तर ते मोठ्या संघर्षाची तयारी करत आहेत,” असे वाटते. टॉम मूडी पुढे म्हणाले, “मला वाटतं की हा सामना अॅशेसच्याही एक पाऊल पुढे जाईल. यात नेहमीच एक सुंदर स्टोरी असते आणि दोन्ही देश उत्कृष्ट क्रिकेट खेळणारे देश आहेत. जेव्हा तुम्ही पाकिस्तान संघाकडे पाहता, तेव्हा त्यांच्यात खूप प्रतिभा दिसते. मात्र, माझ्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे त्यात अनुभवही खेळाडू. त्यामुळे ज्यांना आताच्या काळात अनुभव आणि प्रतिभा यांची सांगड आहे, तो खरा धोकादायक संघ.”
आशिया चषकापूर्वी श्रीलंकेच्या माजी प्रशिक्षकाच्या वक्तव्याने खळबळ उडाली
टॉम मूडी म्हणाले, “ते आपल्या वेगवान गोलंदाजीने भारताची बरोबरी करू शकतात. कारण, त्यांच्याकडे खरा वेग आहे. टीम इंडियाच्या फलंदाजीच्या गुणवत्तेचा एकच मुद्दा दिसतो तो म्हणजे भारताची बॅटिंग डेप्थ. त्यामुळे वरच्या फळीतील बाबर आझमसारख्या खेळाडूवर ते दबाव टाकणार असल्याने हा सामना रंजक असेल.” टॉम मूडीने भारताच्या फलंदाजी क्रमवारीत, विशेषतः नवीन चेंडूसह संभाव्य पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीच्या महत्त्वाच्या भूमिकेवर जोर दिला.
शाहीन आफ्रिदी नव्या चेंडूने भारतासाठी मोठा धोका बनू शकतो
२०२१च्या टी२० विश्वचषकात शाहीन आफ्रिदीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. मात्र, गेल्या टी२० विश्वचषकात आफ्रिदीला हा पराक्रम करण्यात यश आले नाही. असे असले तरी आगामी आशिया चषक स्पर्धेत तो नव्या चेंडूने भारतीय संघासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल टॉम मूडी म्हणाले की, “जर आफ्रिदी नवीन चेंडूवर विकेट घेण्यात यशस्वी झाला तर त्याचा भारतीय संघाच्या मधल्या फळीवर दबाव निर्माण होईल.