Shoaib Akthar on Team India: पाकिस्तानला गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत आहे, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३साठी पाकिस्तानच्या संघात कोणाचा समावेश करावा. अख्तरने पत्रकार परिषदेत सांगितले की, “गोलंदाजीतील त्यांच्या ताकदीशिवाय, पाकिस्तान त्यांच्या फलंदाजीत खूप स्थिर संघासारखा दिसतो.” मात्र, काही दिवसांपूर्वी टीम इंडियाला विश्वचषक २०२३मधून आम्हीच बाहेर काढू, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आज आपले विधान बदलले आहे.

शोएब अख्तर म्हणाला, “माझ्या मते पाकिस्तानला गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंची उणीव भासत आहे. पाकिस्तान भारतात फेव्हरिट म्हणून प्रवेश करेल. मी तुमच्याशी खोट बोलणार नाही पण काही उणीवा या पाकिस्तान संघात आहेत. एकावेळी एकतर फलंदाज अधिक निवडू शकतात किंवा गोलंदाज. जशी त्यावेळची परिस्थिती असेल त्यानुसार हे बदल संघात होईल.”

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Those who do not accept Hindu Rashtra should go to Pakistan says Dhirendrakrishna Shastri
हिंदू राष्ट्र मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे, धीरेंद्रकृष्ण शास्त्रींचे वक्तव्य
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक सुपर-४ च्या जागेवरील वादावर सुनील गावसकर मोठे विधान; म्हणाले, “कोणीतरी याची सत्यता…”

रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असणारा शोएब अख्तर भारतीय संघाबाबत म्हणाला, “आशिया चषकाबाबत खूप प्रामाणिकपणे सांगेन, मला वाटते की भारत देखील फेव्हरेट्सपैकी एक आहेत. भारत आणि पाकिस्तान हे उपखंडात खेळणारे दोन मजबूत संघ आहेत. आम्ही त्यांना श्रीलंकेत फक्त गोलंदाजीच्या जोरावर पराभूत करू शकतो. विश्वचषक २०२३ हा भारतात होणार असून टीम इंडियाला भारतात पराभूत करणे ही सर्वात अशक्य गोष्ट आहे. मात्र, भारत व्यतिरिक्त इतर संघांना उपखंडात पाकिस्तानला भारतामध्ये पराभूत करणे जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. यामागील कारण म्हणजे दोन्ही संघांकडे चांगली वेगवान गोलंदाजी आहे. खरेतर एखाद्याकडे चांगली वेगवान गोलंदाजी असणे, त्याच ताकदीचे फिरकीपटूही संघाच्या ताफ्यात असणे हे दोन्ही संघांमध्ये आत्मविश्वास वाढवणारे आहे.”

शोएब त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना पुढे म्हणाला, “पाकिस्तानची बॅटिंग युनिट पूर्वी कमकुवत दिसत होती, पण आता त्यात खूप बदल झाला आहे. ते अतिशय संघटित संघासारखे खेळताना दिसतात. बाबरमुळे फलंदाजीत पाकिस्तान धावसंख्येचा पाठलाग करू शकतो, असे दिसते. आम्ही इतक्या सहजासहजी बाहेर पडणार नाहीत. आम्ही धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज दिसत आहोत. त्यामुळे मला वाटते की, तो एक चांगला संघ आहे.”

हेही वाचा: IND vs PAK: टीम इंडियाचे वर्क आउट पाहून प्रतिस्पर्धी संघांना भरली धडकी, पाकिस्तान सामन्यापूर्वी नेटमध्ये केला कसून सराव

आशियाई चषक २०२३ मध्ये पाकिस्तानकडून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी दिसून आली आहे. या स्पर्धेत दोन विजय आणि एक सामना रद्द करून संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. आता १० सप्टेंबरला कोलंबोमध्ये संघाचा सामना भारताशी होणार आहे. आशिया चषकातील साखळी सामन्यातील भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती.