India vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषकाच्या तिसऱ्या सामन्यात शनिवारी (२ सप्टेंबर) भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. अ गटातील या आवृत्तीतील भारताचा हा पहिलाच सामना आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या सामन्यात त्याने नेपाळचा पराभव केला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट, हारिस, रोहित आणि बाबर सामन्याआधी भेटले. त्यांच्यातील संभाषणाचा मजेशीर संवाद व्हायरल होत आहे.

कँडी, श्रीलंकेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये एकमेकांशी कौटुंबिक संवाद साधताना दिसले. सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांच्या कुटुंबीयांची तब्येत कशी आहे याबाबत चर्चा केली. त्याचवेळी किंग कोहली आणि हारिस रौफ सराव सत्रादरम्यान मैदानावर चर्चा करताना दिसले.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकी खुलासा करत म्हणाले, “भाई खूप…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sajid Khan epic reply to reporters video viral
Sajid Khan : ‘आता अल्लाहने मला लूकच असा दिलाय की…’, साजिद खानच्या उत्तराने पत्रकार परिषदेत पिकला एकच हशा, VIDEO व्हायरल
Rishabh Pant Stump Mic Video Goes Viral As He Planned to Out Ajaz Patel with Washington Sundar Backfires IND vs NZ
IND vs NZ: मला काय माहित त्याला हिंदी समजते…”, पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची योजना फसली; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: आईवरून मारला टोमणा आणि सूर्याने केली मारामारी; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्या दादा आणि शत्रू यांच्यात राडा होणार
Shikhar Dhawan Shared Hilarious Video of Laddu Mutya Baba Fans React Winner of The Trend
Shikhar Dhawan: “फॅन वाले बाबा की..”, शिखर धवनलाही ‘लड्डू मुत्त्या’ ट्रेंडची पडली भुरळ, Video वर कमेंट्सचा पाऊस
prathamesh parab dance on dada kondke song
काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ
India Bowling Morne Markel Tunrs Net Bowler for KL Rahul Ahead of IND vs NZ 2nd Test Said Need To Remind Myself That I Am 40 Watch Video
VIDEO: “मी ४० वर्षांचा झालोय हे कळायला…”, केएल राहुलसाठी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल झाला नेट बॉलर, पाहा काय म्हणाला?

आशिया चषकाच्या या महत्त्वाच्या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. सामन्यापूर्वी सराव सत्रात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर एकत्र आले आणि दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाडूंनी एकमेकांशी मुक्तपणे संवाद साधला. या छोट्या भेटीचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये बाबर आझम, इमाम आणि रोहित शर्मा एकमेकांना भेटताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये बाबर आझमने भारतीय कर्णधाराशी बोलताना पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांचीही विचारपूस केली. बाबरने रोहितला त्याच्या कुटुंबाची चौकशी करताना एक प्रश्न विचारला. तो म्हणाला, “कँडीला त्यांना का घेऊन आला नाही रोहित भाई तू? “ त्यावर रोहित हसला आणि म्हणाला की, “मुलगी समायरा शाळेत जायला लागली आहे आणि त्यामुळे तो सोबत येऊ शकला नाही. आता कुणाला तरी घरी ठेवावे लागेलच ना, त्यामुळे बायकोला घरी ठेवले आहे.”

हेही वाचा: IND vs PAK: तो आला, त्याने पाहिलं अन्…; शाहीन आफ्रिदीने रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीच्याही केल्या दांड्यागुल, पाहा Video

“मी जिथून जातो तिथं कोहली-कोहली असतो”- हारिस रौफ

सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानावर एकत्र बोलताना दिसले. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकात विराटने हारिसच्या चेंडूवर दोन संस्मरणीय षटकार ठोकले होते. कोहलीला पाहताच रौफला विराटची ती खेळी आठवली. ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली मैदानावर उभ्या असलेल्या रौफशी हस्तांदोलन करत आहे. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी संवाद साधला. या व्हिडीओमध्ये हारिस म्हणतो आहे की, “मी जिथून जातो तिथं कोहली-कोहली असतो.”

हेही वाचा: Sunil Gavaskar: “के.एल. राहुल विश्वचषकापूर्वी एकही सामना खेळणार नाही, अजून किती…”; सुनील गावसकर टीम इंडियावर भडकले

भारताचा स्कोअर २० ओव्हरमध्ये १०२/४

भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. चार विकेट्स पडल्यानंतर इशान किशन आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या यांनी जबाबदारी स्वीकारली. टीम इंडियाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १०२ धावा केल्या आहेत. इशान किशन ३२ आणि हार्दिक पांड्या १६ धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे.